1 / 6साडी म्हणजे महिलांच्या आवडीचा विषय. साडीमध्ये अनेक प्रकार असतात. प्रत्येक राज्याची काहीतरी खासियत असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जाते. काही प्रकार मात्र एवढे सुंदर असतात, जे पाहताच मनात भरतात. असाच एक प्रकार म्हणजे सुगुंडी साडी. 2 / 6अगदी साधी मात्र दिसायला फारच सुंदर अशीही साडी तुम्ही कधी नेसली आहे का? ही साडी येत्या सणांसाठी नक्की घेऊन ठेवा. अगदीच सुंदर दिसाल. तसेच या साडीची काही वैशिष्ट्ये आहेत. जी या प्रकाराला इतरांपेक्षा नाविन्यपूर्ण ठरवतात. 3 / 6सुगुंडी म्हणजे गोल. गोलाकार असलेली साडी असा या शब्दाचा अर्थ आहे. सुगुंडी साडीमध्ये आता विविध प्रकार असतात. मात्र शक्यतो या साडीवर लहान गोल बुट्टे असतात. त्यामुळे साडीला नावही तसेच दिले गेले असावे. 4 / 6मदूराई,तमिळनाडू आदी ठिकाणी हा प्रकार वापरला जातो. ही साडी साऊथ इंडियन लोकांमध्ये फार आवडीने वापरली जाते. त्यावर सुंदर असा गजरा माळल्यावर रुप काही औरच दिसते. 5 / 6दक्षिण भारतातील राण्या-महाराण्या या प्रकारच्या साडी नेसत असतं असे मानले जाते. तमिळनाडूमध्ये अनेक उत्सवांना ही साडी वापरली जाते. तरुण मुली आजकाल पुन्हा अशा साड्यांना प्राधान्य देतात. 6 / 6ही साडी लोकप्रिय असण्यामागे आणखी एक कारण म्हणजे ती वापरायला फार सोपी आहे. तसेच तिला जास्त वजन नसल्याने त्यात वावरणे एकदम सोपे होते. त्यात कॉटन असल्याने घाम आणि गरमी जरा कमी होते.