1 / 7दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आपल्या डॅशिंग अदांजासाठी ओळखली जाते. ती कित्येकांची फॅशन आयकॉन बनली असून, तिच्या मनमोहक लुकवर चाहते घायाळ होतात. सोनाक्षी सोशल मिडीयावर सक्रीय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करत असते. 2 / 7ती नुकतीच फिनलँडला गेली होती. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोंमध्ये विंटर लूक कॅरी केला असून, तिचा हा लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या थंडी आहे, सोनाक्षीसारखा विंटर लूक आपणही जमवू शकतो.3 / 7सोनाक्षी सिन्हाने स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लॉंग पफ्ड जॅकेट परिधान केले आहे. तिने मफलरच्या जागी पुलओवर शर्टसह लेदरची पँट घातली केली आहे. 4 / 7या फोटोमध्ये सोनाक्षीने लेगिंग्स आणि बूट्ससोबत पांढऱ्या रंगाचे पफ्ड जॅकेट परिधान केले आहे. पांढर्या शुभ्र बर्फात पांढर्या जॅकेटमध्ये सोनाक्षी खूपच मस्त दिसत आहे. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी, तुम्ही असे जॅकेट परिधान करू शकता.5 / 7सोनाक्षीने येथे काळ्या रंगाचा हायनेक पुलओव्हर आणि पांढऱ्या जॅकेटमध्ये काळी पँट स्टाईल केली आहे. ज्यात ती खूप क्युट दिसत आहे. 6 / 7जर आपण घरच्या घरी काही विंटर प्लॅन्स अथवा हाउस पार्टीचे आयोजन करत असाल तर, सोनाक्षीचा हा लूक ट्राय करा. यात तिने पिंक हुडी परिधान केला आहे. यातील तिचा क्युट लूक सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. 7 / 7आपल्याला जर कलरफुल लूक हवा असल्यास सोनाक्षीचा हा स्ट्राइप जॅकेट लूक ट्राय करा. शॉट लेंथ विथ बॅगी स्टाइल जॅकेट लूकवर आपण ब्लॅक जीन्स परिधान करू शकता.