1 / 15ऑफिस लूक म्हटलं की साधेपणा, डिसंट, एलिगन्स आणि प्रोफेशनल टच या गोष्टींना खास महत्त्व असतं. पण या फॉर्मल लूकमध्येही आपले पारंपरिक मंगळसूत्र स्टायलिश पद्धतीने कसं कॅरी करायचं, हा अनेक महिलांना पडणारा नेहमीचा प्रश्न असतो.2 / 15शर्ट, कोट किंवा कोट-स्कर्टसारख्या आउटफिट्सवर जड आणि भडक दागिने न शोभता, छोटं, नाजूक आणि मिनिमल डिझाइनचं मंगळसूत्र अधिक आकर्षक दिसतं. हे मंगळसूत्र तुमच्या ‘बॉस लेडी’ लूकला एक क्लासी आणि ग्रेसफुल टच देतं.3 / 15ऑफिसमध्ये वावरताना आपला लूक जितका कॉन्फिडन्ट असेल तितकीच आपली छाप पडते. सध्याची 'बॉस लेडी' जेव्हा शर्ट-पॅन्ट, ब्लेझर किंवा फॉर्मल स्कर्ट अशा कॉर्पोरेट ड्रेसिंगमध्ये ऑफिसला जाते, तेव्हा दागिन्यांची निवड करताना अनेकींचा गोंधळ उडतो. पारंपरिक जड मंगळसूत्र अशा वेस्टर्न लूकवर नेहमीच सूट होईल असे नाही. अशा वेळी तुमच्या प्रोफेशनलिझममध्ये भर घालेल आणि लूक अधिक 'शार्प' करेल ते म्हणजे नाजूक आणि मॉडर्न डिझाइनचे मंगळसूत्र.4 / 15ऑफिस फॉर्मल्सवर शोभून दिसणाऱ्या अशाच काही ट्रेंडी आणि एलिगंट मंगळसूत्राच्या डिझाइन्स पाहणार आहोत, ज्या तुम्हाला एक परफेक्ट 'कॉर्पोरेट लुक' मिळवून देतील.5 / 15पांढऱ्या शर्ट किंवा फॉर्मल सूटवर एक छोटासा हिरा असलेले नाजूक मंगळसूत्र अतिशय क्लासिक दिसते. हे साधे असूनही खूप महागडे आणि प्रोफेशनल वाटते.6 / 15चौकोनी, त्रिकोणी किंवा वर्तुळाकार पेंडंट असलेली मंगळसूत्रे सध्या खूप ट्रेंडी आहेत. फॉर्मल शर्टच्या कॉलरखाली हे डिझाइन उठून दिसते.7 / 15 ज्यांना काळे मणी हवे आहेत, त्यांनी केवळ २ ते ४ मणी असलेल्या अतिशय पातळ सोन्याच्या चैनचे मंगळसूत्र निवडावे. हे कोणत्याही रंगाच्या फॉर्मल ड्रेसवर मॅच होते.8 / 15 ऑफिस वेअरमध्ये सध्या 'रोज गोल्ड' रंगाची खूप क्रेझ आहे. पेस्टल रंगाचे शर्ट किंवा कोट असतील, तर रोज गोल्डचे मंगळसूत्र तुम्हाला एक सॉफ्ट पण पॉवरफुल लूक देते.9 / 15 साधी, बारीक चेन आणि छोटसं पेंडंट असलेलं शर्ट किंवा ब्लेझरवर खूप एलिगंट दिसतं.10 / 15 छोट्या डायमंड पेंडंटसह मंगळसूत्र तुमच्या फॉर्मल लूकला प्रीमियम फिनिश देतं.11 / 15दोन हलक्या लेअर्समध्ये असलेल्या या डिझाईन्सच मंगळसूत्र स्टायलिश पण अगदी तुमच्या ऑफिस फॉर्मल लुकला शोभून दिसतं. 12 / 15 जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल, तर साध्या सोन्याच्या तारेत गुंफलेली छोटी फुले किंवा पानांचे डिझाइन असलेले मंगळसूत्र निवडा. हे दिसायला अतिशय नाजूक असते आणि डार्क रंगाच्या ब्लेझरवर (उदा. नेव्ही ब्लू किंवा ब्लॅक) उठून दिसते.13 / 15पांढऱ्या मोत्याची सर असलेली किंवा पेंडंटच्या खाली एक छोटा मोती असलेले मंगळसूत्र अत्यंत 'सोफिस्टिकेटेड' लूक देते. जर तुम्ही ऑफिस मीटिंगसाठी सिल्कचा फॉर्मल शर्ट किंवा साडी नेसणार असाल, तर हा पॅटर्न नक्की ट्राय करा.14 / 15 सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये हे डिझाइन कॉर्पोरेट जगतात खूप प्रसिद्ध आहे. निळ्या रंगाचा छोटा 'इव्हिल आय' मणी आणि आजूबाजूला काळे मणी असलेले हे मंगळसूत्र मॉडर्न लूकसाठी परफेक्ट आहे.15 / 15तुमच्या किंवा जोडीदाराच्या नावाचे पहिले अक्षर असलेले पेंडंट सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. हे वैयक्तिक टच देते आणि फॉर्मल शर्टच्या 'V' नेकलाइनमध्ये अतिशय सुबक दिसते.