Join us
Daily Top 2 Weekly Top 5

२५० रुपयांत खरेदी करा शॉर्ट कुर्ती, जीन्स-पलाझोवर सुंदर दिसतील ५ लेटेस्ट पॅटर्न, उन्हाळ्यात गरमही होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2026 20:00 IST

1 / 9
उन्हाळ्यात फॅशन आणि कम्फर्टेबल याचा मेळ साधणं खरंतर कठीण असतं. जड एम्ब्रॉयडरी असलेले ड्रेस किंवा घट्ट कपडे घातल्याने उन्हाचा त्रास अधिक होतो. अशा वेळी महिलांची पहिली पसंती असते ती म्हणजे 'शॉर्ट कुर्ती'. शॉर्ट कुर्ती केवळ दिसायला स्टायलिश नसते, तर ती घालण्यास अत्यंत हलकी आणि सुटसुटीत असते. शॉर्ट कुर्ती ही जीन्स, पलाझो, पँट किंवा अगदी धोती सलवारवरही उठून दिसते. (Best summer tops for girls)
2 / 9
२५० रुपयांच्या बजेटमध्ये आपण शॉर्ट कुर्तीचे असे काही भन्नाट पॅटर्न खरेदी करू शकता, जे महागड्या बुटीक कुर्तीसारखे लूक देतील. कॉलेज असो, ऑफिस असो किंवा रोजच्या वापरासाठी, हे लेटेस्ट डिझाईन्स आपल्याला उन्हाळ्यात घामापासून सुटका देतील. (Affordable ethnic wear for women)
3 / 9
आपण फ्लॉवर प्रिटेंड शॉर्ट कुर्ती घेऊ शकतो. या कुर्ती जीन्स किंवा पलाझोवर छान दिसतात. दिसायला ट्रेंडी आणि बजेटमध्ये एकदम फिट असतात.
4 / 9
सध्या मसाबा कट नेकलाइन शॉर्ट कुर्ती ट्राय करा. सध्या हा ट्रेंडी लूक आहे. या नेकलाइनच्या पूर्ण बाह्यांच्या कुर्ती खूप स्टायलिश दिसतात. या कुर्तीसोबत आपण पलाझो, पँट्स किंवा जीन्स घालू शकतो.
5 / 9
आपण फ्रॉक-कट स्टाईलमध्ये देखील कुर्ती शिवू शकतो. हे उन्हाळ्यात अगदी परफेक्ट आहे. याची सैल फिटिंग खूप आरामदायक असते. कोणत्याही बॉटमसोबत आपण सहजपणे घालू शकतो, ज्यामुळे आपला लूक अधिक खुलेल
6 / 9
आपल्याला सैल बाह्या आवडत असतील तर पाकिस्तानी कुर्ती निवडू शकता. यावर फुलांची नक्षी असते. आपण यावर पॅन्ट किंवा पलाझो घालू शकतो.
7 / 9
पेपलम कुर्ती सध्या खूप फॅशनमध्ये आहे. कंबरेपाशी थोडा घेर असलेल्या या कुर्ती जीन्सवर अतिशय सुंदर दिसतात. जयपुरी प्रिंट किंवा कलमकारी प्रिंटमध्ये या कुर्ती सहज मिळतील. उन्हाळ्यासाठी हे चांगले कॉटन डिझाईन आहे.
8 / 9
हलक्या रंगाच्या (पेस्टल शेड्स) चिकनकारी शॉर्ट कुर्ती पांढऱ्या जीन्स किंवा पलाझोवर रॉयल लूक देतात. यातून हवा खेळती राहते, त्यामुळे गरमही होत नाही.
9 / 9
शर्टसारखी कॉलर असलेल्या ए-लाईन कुर्ती कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची पहिली पसंती आहेत. या कुर्ती कॉटन-लिनन मिक्स फॅब्रिकमध्ये उपलब्ध असतात.
टॅग्स : फॅशनमहिला