1 / 7उन्हाची तिव्रता जाणवू लागली की सगळ्यात आधी आठवण येते ती गॉगलची. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी या दिवसांत गॉगल अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीसाठी गॉगलची खरेदी करायची असेल तर कोणते प्रकार सध्या ट्रेण्डी आहेत, ते एकदा पाहून घ्या.2 / 7फॅशन एक्स्पर्ट्सच्या मते यावर्षी ओव्हरसाईज गॉगल ट्रेण्डिंग असतील. अशाप्रकारचे ग्लासेसचा आणि बाजुच्या स्टिक्सचा आकार मोठा असणारे गॉगल यंदा फॅशनमध्ये असतील. 3 / 7काळा, निळा अशा डार्क ग्लासेसपेक्षा अशा पद्धतीचे ग्लासेस सध्या अधिक घेतले जातात.4 / 7कॅट आय गॉगलची क्रेझ अजूनही कायम आहे. यात आणखी वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.5 / 7अशा पद्धतीचा वेगळा आकार असणारे ओव्हरसाईज गॉगलही तुम्ही घेऊ शकता.6 / 7हा षटकोनी आकाराचा गॉगल बघा. असा एखादा वेगळा आकार मिळाला तर नक्कीच तुमचा गॉगल जास्त स्टायलिश वाटेल.7 / 7आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटामुळे अशा गोल आकाराच्या गॉगलचीही क्रेझ आहे.