Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Summer Collection: उन्हाळ्यासाठी निवडा १० परफेक्ट फ्लोरल साड्या! फुलफुलांच्या साडीत दिसाल सिंपल आणि कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 16:28 IST

1 / 10
१. उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये फ्लोरल प्रिंट साड्यांचं जबरदस्त कलेक्शन दिसू लागतं.. यंदा तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आला आणि त्याच्या प्रमोशनसाठी आलियाने एक से एक फ्लोरल प्रिंट साड्या नेसल्या.. आपल्याही कलेक्शनमध्ये (Summer Collection) अशी एखादी साडी हवीच... असं तिचे फाेटो पाहून अनेकींना मनोमन वाटलं...
2 / 10
२. जान्हवी कपूरची ही फ्लोरल प्रिंट साडीही सोशल मिडियावर चांगलीच गाजली होती. तिची ही साडी ऑर्गेंझा सिल्क प्रकारातली असून मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे.
3 / 10
३. फुलाफुलांच्या साडीतला माधुरी दिक्षितचा हा लूक खरोखरच खास आहे.. अशी एखादी सोबर रंगाची सिंपल साडी आणि त्यावर साजेशी ॲक्सेसरीज आणि हेअरस्टाईल केली की झाला पार्टी लूक तयार..
4 / 10
४. मॉनी रॉय हिने नेसलेली साडी देखील ऑर्गेंझा सिल्क प्रकारातली आहे. हा साडीचा प्रकार अतिशय लाईटवेट असल्यामुळे उन्हाळ्यासाठी तो परफेक्ट मानला जातो. मॉनीच्या या साडीची किंमत तब्बल २४ हजार रुपये आहे..
5 / 10
५. कतरिनाची ही काळी साडी देखणी आहे... साडीचे काठ आणि ब्लाऊज यावर सिक्विन वर्क केलं असून एखाद्या छोटेखानी पार्टीसाठी अशा प्रकारची साडी अगदी योग्य आहे.
6 / 10
ऑर्गेंझा साडीतला हा आणखी एक प्रकार.. ही साडी ऑफिसवेअर लूक देखील देऊ शकते. तुम्ही ज्या प्रकारचा मेकअप, हेअरस्टाईल आणि ॲक्सेसरीज निवडाल, तशा प्रकारचा लूक ही साडी देणार..
7 / 10
७. दिपिकाची ही साडी कम्प्लिट पार्टीवेअर आहे... अशा मोठ्या प्रिंटच्या साड्या दिपिकासारख्या उंच आणि शिडशिडीत महिलांना जास्त शोभून दिसतात.
8 / 10
८. बिपाशाने नेसलेली ही साडी सब्यासाची कलेक्शनची असून कतरिनाच्या साडीप्रमाणेच या साडीच्या काठांवर आणि ब्लाऊजवर सिक्विन वर्क केलेलं आहे..
9 / 10
९. फ्लोरल प्रिंट साडीत अगदीच सुळसुळीत प्रकार नको असेल, तर सोनाक्षीच्या या साडीप्रमाणे एखादी साडी तुम्ही निवडू शकता..
10 / 10
१०. साड्यांचा विषय निघाल्यावर विद्या बालनला टाळून चालतच नाही.. विद्याची ही साडी सिल्क प्रकारातली आहे. साडीवर परफेक्ट ज्वेलरी घातल्यास लुक कसा बदलू शकतो, हे विद्याच्या या फोटोवरून दिसून येतं..
टॅग्स : ब्यूटी टिप्सफॅशनसमर स्पेशलसेलिब्रिटी