Join us

कॉटन साडी नेसताना लक्षात ठेवा ५ टिप्स, नेहमीच दिसाल कमाल, सगळेच म्हणतील 'व्वॉव... '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 15:42 IST

1 / 7
कॉटन साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ती जर योग्य पद्धतीने नेसली तर ती तुम्हाला कमालीचा स्मार्ट लूक देते. पण तेच जर तुम्ही ती घाई गडबडीत कशीही नेसली तर त्यात तुम्ही अगदीच काकुबाईही दिसू शकता..
2 / 7
म्हणूनच कॉटनची साडी नेसताना नेमकी काय खबरदारी घ्यायची आणि ती कशा पद्धतीने कॅरी करायची ते पाहूया..
3 / 7
कॉटनची साडी जर ऑफिसला नेसणार असाल तर ती नेहमीच एखाद्या हलक्या रंगाची असावी. त्यामुळे तुम्हाला जास्त फॉर्मल, प्रोफेशनल लूक मिळतो.
4 / 7
कॉटनची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज हे कॉम्बिनेशन तर नेहमीच हिट आहे. त्यामुळे कॉटनच्या साडीवर शक्यतो स्लिव्हलेस ब्लाऊज घाला..
5 / 7
कलमकारी वर्क असणारी कॉटन साडी असेल तर तिच्यावर नेहमी ऑक्सिडाईज दागिने घालण्यास प्राधान्य द्या..
6 / 7
कॉटनच्या साडीवरचे दागिने खूप काळजीपुर्वक निवडा. कारण साडीपेक्षा ते जास्त गॉडी दिसायला नको.
7 / 7
कॉटनची साडी जर एखाद्या छोटेखानी कार्यक्रमाला नेसणार असाल तर त्यावर हेअरस्टाईलची पारंपरिक पद्धतीची करा किंवा मग केस मोकळे सोडा. जास्त कॅची दिसाल.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्सदागिने