Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तेंडुलकरांच्या सुनबाईंच्या हातात दिसल्या पिचोड्या, पाहा पारंपरिक मराठी बांगड्या- हातातला देखणा अलंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 17:11 IST

1 / 7
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाचे फोटो पाहिले तर असतीलच. मराठी पद्धतीनं लग्न लागलं, मंगलाष्टकं म्हणण्यात आली. नव्या सूनबाईंच्या हातात हिरवा चुडा होताच.. पण नीट पाहिलं तर दिसतील चुड्यामागच्या सुंदर सोन्याच्या पिचोड्या. हिऱ्यांच्या बांगड्याही ज्यांना सहज परवडतील अशा घरातील सुनेनं हा पारंपरिक मराठी दागिना मानानं घातला. पिचोड्या घातलेले नवरीचे हात अगदी सुंदर दिसतात.
2 / 7
पाटल्या, बांगड्या, गोठ आणि पिचोड्या हे हातातले अलंंकार मराठी महिलांच्या हातात दिसतातच. गोठ पुढे पाटल्या बांगड्या मध्ये आणि पिचोड्या मागे असा हा थाट असतो.
3 / 7
सानियाने लग्नात लाल बांगड्या तर घातल्याच होत्या. पण त्यासोबतच महाराष्ट्रात नवरीला घालतात तशी हिरवी काकणं अर्थात चुडाही घातला होता. आणि त्या सगळ्या बांगड्यांच्या मागे होत्या सुंदर सोन्याच्या पिचोड्या.
4 / 7
असं म्हणतात की पुर्वीच्या काळी कोल्हापूरच्या मराठा सरदारांमध्ये आणि शाहू महाराजांच्या दरबारातील महिलांमध्ये पिछोडी परिधान करण्याची मोठी प्रथा होती. श्रीमंतीचं ते एक प्रतिक मानलं जायचं.. सणावाराला या पिचोड्या आवर्जून घातल्या जायच्या.
5 / 7
आता पिचोड्या थोड्या मागे पडत चालल्या आहेत. मागे पाटल्या आणि त्यापुढे इतर बांगड्या अशा पद्धतीने आता बांगड्या भरतात. पण आजही पिचोड्यांचे कित्येक नवनवे डिझाईन्स बाजारात मिळत आहेत. कारण परंपरा जपणाऱ्यांना आजही हा दागिना आवडतोच.
6 / 7
अशा पिचोड्या सोन्यात घडवून घेणं सध्या तरी सर्वसामान्यांसाठी खूप महागडं झालं आहे. त्यामुळे मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा मग १ ग्रॅम सोन्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या पिचोड्या तुम्ही घेऊ शकता...
7 / 7
४ ते ५ हजारच्या दरम्यान १ ग्रॅम सोन्यामधल्या पिचोड्यांचे कित्येक आकर्षक डिझाईन्स तुम्हाला मिळू शकतात.
टॅग्स : फॅशनअर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरशुभविवाहदागिने