Join us

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 18:05 IST

1 / 7
सध्या लग्नसराईचा काळ असल्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहे. त्यासाठी अनेकांचा कल दागिन्याच्या बाबतीत हा धातू किंवा मोत्यांकडे वळालेला पाहायला मिळतोय. (pearl necklace designs for wedding)
2 / 7
लग्न, पार्टी किंवा इतर समारंभात आपल्याला नवीन फॅशन करावीशी वाटते. जर यंदाच्या लग्नसराईत तुम्हाला उठून आणि आकर्षित दिसायचे असेल तर मोत्यांच्या ज्वेलरीपासून शाही थाट करु शकता. (latest pearl jewellery for saree)
3 / 7
मोत्याच्या हार पुन्हा एकदा ट्रेंड सेट केला आहे. हा लेइअर्ड मोती चोकर आपल्या सौंदर्यात भर घालेल. मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजवर हा चोकर शोभून दिसेल. (pearl necklace styling with traditional saree)
4 / 7
ही चोकर डिझाईन्स इंडो-वेस्टन लूकवर छान दिसेल. यामध्ये सिल्व्हर आणि सोनेरी मोती आपल्याला बोल्ड लूक देतील. गाऊन किंवा ऑफ-शोल्डर ड्रेसेससोबत कॅरी करू शकता.
5 / 7
आपल्याला रॉयल लूक हवा असेल तर गोल्डन रंगाच्या मोत्याचे हार चांगला पर्याय आहे. कॉलेज फंक्शन्स किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे मोत्याचे नेकलेस डिझाइन सर्वोत्तम आहेत.
6 / 7
आपण साखळीमध्ये मोत्यांचे पेंडेंट घालून एक आकर्षक कॉन्ट्रास्ट तयार करु शकतो. जो आपल्या लूकला चांगली स्टाईल देईल.
7 / 7
मोत्यांमध्ये पांढराच रंग नाही तर गुलाबी, राखाडी, काळा आणि इतर पेस्टल शेड्सचे नेकलेस देखील पाहायला मिळतात. हे रंगबेरंगी मणी आपल्या लूकमध्ये अधिक भर घालतील.
टॅग्स : फॅशनदागिने