Join us

देखण्या पैठणीवरचं ब्लाऊजही सुंदरच हवं.. बघा ७ स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स- पैठणी आणखी उठून दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 13:19 IST

1 / 8
सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे कित्येक जणी पैठणीची खरेदी करतात. आता पैठणीवर त्याच त्या टिपिकल प्रकारचं ब्लाऊज शिवून मजा नाही. म्हणूनच असे काही वेगळे डिझाईन्स पाहा. त्यामुळे पैठणीचं सौंदर्य आणखी खुलून येईल.
2 / 8
पैठणीच्या कापडाच्या बाह्या आणि ब्रोकेडचा कपडा असं कॉम्बिनेशन असणारं ब्लाऊजही पैठणीवर खूप छान दिसतं.
3 / 8
थोडं स्टायलिश ब्लाऊज शिवायचं असेल तर हे असं थोडं वेगळं ब्लाऊज ट्राय करा. हे ब्लाऊज इतर कोणत्याही काठपदर साडीवर छान दिसेल.
4 / 8
मागच्या बाजुने असं डिझाईन असणारं ब्लाऊजही शोभून दिसतं. यामुळे तुमचा लूक जास्त खुलून येतो.
5 / 8
हे एक ब्लाऊज डिझाईन पाहा. जर तुम्हाला खूप हेवी वर्क असणारं ब्लाऊज आवडत नसेल, थोडं साधं- सोबर डिझाईन हवं असेल तर हे डिझाईन आवडू शकतं.
6 / 8
पैठणी ब्लाऊजचं हे आणखी एक सुंदर डिझाईन. कोणत्याही रंगाची पैठणी असली तरी तुम्ही हे ब्लाऊज त्यावर घालू शकता.
7 / 8
असे बाह्यांवर हेवी वर्क असणारे ब्लाऊजही नेहमीच खुलून दिसतात. लग्नसराईमध्ये तर हमखास हे ब्लाऊज खूप डिमांडिंग असतात.
8 / 8
हे एक हेवी डिझाईन असणारं ब्लाऊज. अशा पद्धतीचं ब्लाऊज तरुण मुलींना शोभून दिसतं.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स