Join us
Daily Top 2 Weekly Top 5

राजस्थानच्या राजघराण्याची शान असलेल्या पचेली बांगड्यांचे १० ट्रेंडी डिझाईन्स, कधीच पाहिले नसतील असे ब्रायडल कलेक्शन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 21:00 IST

1 / 12
लग्नसराईचा सिझन आला की पारंपरिक पण रॉयल असा लुक देणारे दागिने शोधण्याची लगबग (traditional rajasthani pachheli bangles for women) सुरू होते. त्यातही राजस्थानी दागिन्यांची आजही एक वेगळीच शान आणि थाट आहे. अशा दागिन्यांमध्ये राजस्थानच्या राजघराण्याची खास ओळख असलेल्या ‘पचेली बांगड्या - कडे’ या विशेष प्रसिद्ध आहेत.
2 / 12
सोनं, कुंदन, मीनाकारी आणि नाजूक नक्षीकामाने सजलेल्या या बांगड्या हातात (Pachheli Bangle New Designs for Women) घातल्या की संपूर्ण लुकला राजेशाही टच मिळतो. यंदाच्या लग्नाच्या सिझनमध्ये पचेली बांगड्यांचे मॉडर्न ते पारंपरिक असे काही नवीन डिझाईन्स खूपच जास्त ट्रेंडमध्ये दिसत आहेत.
3 / 12
पचेली बांगड्या किंवा कडे म्हणजे राजस्थानच्या राजघराण्याची शान असणाऱ्या (latest pachheli bangles designs) पारंपरिक दागिन्यांचा प्रकार... हे प्रामुख्याने सोन्यापासून बनवलेले जाड, भरीव आणि रुंद कडे असतात. हे कडे दिसायला अगदी पारंपरिक असूनही त्यांना एक भव्यदिव्य असा रॉयल लूक असतो. पचेली कडे हाताच्या मनगटावर सहज बसतात आणि संपूर्ण लूकला एक शाही टच देतात.
4 / 12
जाड, भरीव, रुंद डिझाईन आणि कुंदन - मीना नक्षीकामासाठी प्रसिद्ध असलेल्या पचेली बांगड्या कोणत्याही ब्रायडल लुकला पारंपरिक आणि आकर्षक रॉयल टच देतात.
5 / 12
कुंदन पचेली ही सर्वात ट्रेंडी डिझाईन आहे. सोन्याच्या बेसवर चमकदार कुंदनचे काम केलेले असते. हे कडे लेहेंगा आणि भरजरी वस्त्रांवर खूप उठून दिसतात आणि हाताला भरगच्च लूक देतात.
6 / 12
मीनाकारी पचेली या डिझाईनमध्ये सोन्यावर रंगीत मीनाकारी काम केलेले असते. लाल, हिरवा, निळा यांसारख्या पारंपरिक रंगांचा वापर केल्यामुळे हे कडे अधिक कलात्मक आणि पारंपरिक दिसतात.
7 / 12
ज्या वधूंना जास्त नक्षीकाम नको आहे, पण भरीव आणि शुद्ध सोन्याचा लूक हवा आहे, त्यांच्यासाठी साधी, रुंद आणि जाड पचली परफेक्ट आहे. हे कडे त्यांच्या वजनामुळे आणि रुंदीमुळेच आकर्षक दिसतात.
8 / 12
जडाऊ पचेली यामध्ये नैसर्गिक हिरे किंवा पोल्कीचा वापर केला जातो. अत्यंत बारीक आणि कुशलतेने केलेले हे काम या कड्यांना अतिशय महागडा आणि खास लूक देते.
9 / 12
स्टोनच्या पचेली बांगड्या देखील तितक्याच सुंदर आणि आकर्षक दिसतात. अशा बांगड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत, ज्या बहुतेक महिलांना खूप आवडतात. स्टोनच्या अशा सुंदर पचेली बांगड्यांचा समावेश करून तुमच्या हातांचे सौंदर्य अधिक वाढवू शकता.
10 / 12
आपण अशा प्रकारच्या फ्लोरल शेपच्या पचेली बांगड्या देखील ट्राय करू शकता. या बांगड्या आणि कडे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात घालून तुमचा लूक अधिक खास करु शकता, अशा बांगड्या तुमच्या हातांचे सौंदर्य दुपटीने वाढवतील.
11 / 12
जर तुम्हाला डायमंडचे दागिने घालायला फार आवडत असतील तर आपण अशा प्रकारचे थोडे मॉडर्न डिझाईन्स असलेल्या डायमंडच्या पचेली बांगड्या किंवा कडे देखील हातात घालू शकता.
12 / 12
या लग्नसराईत तुमचा लूक अधिक सुंदर, आकर्षक व इतरांपेक्षा उठून दिसण्यासाठी राजस्थानच्या राजघराण्याची शान असलेल्या या पचेली बांगड्या व कडे तुमच्यासाठी परफेक्ट चॉईस आहेत.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्सशुभविवाहदागिने