Join us
Daily Top 2 Weekly Top 5

साडी १ - ड्रेस १०, पाहा एकाच साडीतून शिवता येतील असे दहा डिझायनर ड्रेसेस, बजेट कमी स्टाइल जबरदस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 21:53 IST

1 / 14
अनेकदा कपाटात एखादी सुंदर साडी वर्षानुवर्षे तशीच पडून राहते. कधी फॅशन बदलते, तर कधी एकच साडी बरेचदा (how to reuse old saree for dresses) नेसून ती पुन्हा - पुन्हा नेसण्याची इच्छाच होत नाही. आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात एखादी अशी साडी नक्कीच असते, जिच्याशी खूप आठवणी जोडलेल्या असतात किंवा जिची डिझाईन खूप सुंदर असते, पण आता ती साडी म्हणून नेसली जात नाही.
2 / 14
वर्षानुवर्षे नेसून झालेल्या अशा साड्या नुसत्या कपाटात पडून न ठेवता, आपण त्यापासून (old saree reuse ideas for outfits) अत्यंत स्टायलिश आणि मॉडर्न असे वेगवेगळ्या पॅटर्नचे आऊटफिट्स शिवू शकता.
3 / 14
फक्त साडी नेसण्यापुरताच तिचा वापर मर्यादित न ठेवता, त्याच साडीचे अनारकली ड्रेस, पंजाबी सूट, लॉन्ग कुर्ता, वन पीस किंवा अगदी को-ऑर्ड सेटसुद्धा तयार करता येतो. हे साडीचे तयार केलेले वेगवेगळे आऊटफिट्स फक्त युनिकच दिसत नाहीत, तर बजेट - फ्रेंडली आणि फॅशनचा सुंदर पर्यायही ठरतात.
4 / 14
पारंपारिक काठपदराची साडी असो किंवा हलकी शिफॉन-जॉर्जेट, प्रत्येक साडीतून एक वेगळा आणि हटके ड्रेस शिवता येऊ शकतो. एका साडीपासून तयार करता येणारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस पॅटर्न, जे तुमच्या वॉर्डरोबला देऊ शकतात एक नवा आणि फ्रेश लूक...कपाटातील तुमच्या जुन्या साडीचा वापर करून तुम्ही कोणते ड्रेसचे ट्रेंडी पॅटर्न शिवू शकता ते पाहा...
5 / 14
सध्या को-ओर्ड सेटचा मोठा ट्रेंड आहे. एका साडीपासून परफेक्ट मॅचिंग टॉप आणि बॉटम तयार करून मॉडर्न को-ऑर्ड सेट शिवता येतो. साडीच्या कापडापासून टॉप आणि पॅन्ट असा मॅचिंग सेट शिवल्यास तो खूपच मॉडर्न दिसतो. को -ओर्ड सेट शिवताना आपण आपल्या आवडीनुसार कुर्ता घेरदार किंवा स्ट्रेट कट फिटिंगचा शिवू शकता यामुळे लूक अधिकच उठावदार दिसेल. साडीच्या कापडापासून तुम्ही 'शॉर्ट कुर्ता आणि पँट' किंवा 'शर्ट आणि प्लाझो' असा सेट शिवू शकता. जर साडी प्रिंटेड असेल (उदा. फ्लोरल किंवा बांधणी प्रिंट), तर हा सेट खूपच स्टायलिश दिसतो. विशेषतः कॉटन, सिल्क किंवा क्रेप साड्या को-ओर्ड सेटसाठी सर्वोत्तम ठरतात. हे सेट तुम्ही ऑफिस वेअर, कॅज्युअल आऊटिंग लूकसाठीही वापरू शकता.
6 / 14
काठपदराच्या किंवा सिल्क साडीचा घोळदार अनारकली ड्रेस अत्यंत रॉयल दिसतो. साडीच्या पदराचा वापर तुम्ही ड्रेसच्या किंवा ओढणीच्या काठांवर मस्त बॉर्डर लावून तो अधिक आकर्षक करू शकता. साडीच्या मोठ्या लांबीमुळे अनारकलीला भरपूर घेर मिळतो. साडीचे जड काठ खालच्या बाजूला लावल्यामुळे ड्रेसला एक महागडा लूक येतो. साडीच्या पदराचा उपयोग ड्रेसच्या वरील भागासाठी करा, ज्यामुळे समोरून तो अतिशय डिझायनर वाटेल.
7 / 14
जर तुम्हाला जास्त हेवी ड्रेस नको असेल आणि काहीतरी हलकं-फुलकं पण ट्रेंडी हवं असेल, तर साडीपासून बनवलेला 'फ्रॉक स्टाईल ड्रेस' एक उत्तम चॉईस आहे. हा ड्रेस दिसायला वेस्टर्न असला तरी साडीच्या फॅब्रिकमुळे त्याला एक वेगळाच 'एथनिक टच' मिळतो. हलका, फ्लोई आणि फेमिनिन लूक देणारा फ्रॉक साडीच्या कापडातून सहज तयार होतो. असा हा फ्रॉक स्टाइल ड्रेस आपण एखाद्या खास प्रसंगी किंवा घरातील लग्नकार्य, हळद, मेहेंदी, सणावाराला घालू शकता. साडीच्या कापडापासून गुडघ्यापर्यंत लांबीचा किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचा असणारा फ्रॉक शिवता येतो. यामध्ये तुम्ही 'ए-लाईन' किंवा 'फ्लेअर्ड' असे दोन्ही प्रकार ट्राय करू शकता. कंबरेपाशी छोटी प्लेट्स किंवा 'गॅदर्स' देऊन खालचा घेर वाढवता येतो. साडीची बॉर्डर ड्रेसच्या खालच्या बाजूला किंवा हाताच्या टोकाला लावल्यास तो अधिक उठून दिसतो. हा पॅटर्न तरुणींपासून ते लहान मुलींपर्यंत सर्वांनाच खूप सुंदर दिसतो.
8 / 14
साडीचे कापड वापरून एलिगंट कुर्ता आणि मॅचिंग दुपट्ट्यासोबतच पंजाबी सूट देखील शिवता येतो. विशेषतः काठपदराच्या साड्यांपासून तयार केलेले सूट खूपच रिच दिसतात. साडीच्या प्लेन भागाचा वापर करून 'कुर्ता' शिवा आणि साडीचे काठ कुर्तीच्या स्लीव्हजवर आणि खालच्या बाजूला लावा. साडीचा पदर हा आधीच डिझायनर असतो, त्यामुळे त्याचा वापर तुम्ही 'दुपट्टा' म्हणून करू शकता. यामुळे तुम्हाला ड्रेससाठी वेगळी ओढणी विकत घेण्याची गरज पडणार नाही. उरलेल्या साडीच्या कापडापासून तुम्ही पटियाला सलवार, सिगरेट पॅन्ट किंवा अगदी चूडीदारही शिवू शकता.
9 / 14
जर तुम्हाला साडीपासून काहीतरी हटके आणि 'फंक्शन रेडी' आउटफिट करायचा असेल, तर हा थ्री-पीस सेट सर्वोत्तम पर्याय आहे. एकाच साडीतून हा संपूर्ण सेट तयार करता येतो आणि तो दिसायला अतिशय ग्लॅमरस वाटतो. जर साडीचं कापड भरगच्च असेल, तर त्याचा मोठा घोळदार स्कर्ट आणि त्यावर साडीच्या पदराचा क्रॉप टॉप शिवता येतो. साडीची बॉर्डर स्कर्टच्या कमरेला किंवा खालच्या घेऱ्याला लावल्यास त्याला 'डिझायनर लूक' मिळतो. साडीच्या ब्लाऊज पीसचा किंवा साडीतील प्लेन भागाचा वापर करून एक स्टायलिश क्रॉप टॉप शिवता येतो. साडीच्या पदरापासून किंवा भरगच्च नक्षी असलेल्या भागापासून गुडघ्यापर्यंत किंवा टाचेपर्यंत लांब असलेले 'लॉन्ग जॅकेट' शिवा. हे जॅकेट तुमच्या साध्या आऊटफिटलाही 'रॉयल' बनवते. हे लॉन्ग जॅकेट तुम्ही फक्त या स्कर्टवरच नाही, तर जीन्स आणि टॉपवर किंवा प्लेन ड्रेसवर सुद्धा 'मिक्स अँड मॅच' करून वापरू शकता. लग्नसराई किंवा मोठ्या पार्ट्यांसाठी हा एक परफेक्ट 'मोडर्न-ट्रेडिशनल' लूक आहे.
10 / 14
जुन्या हेव्ही साड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी लेहेंगा हा सर्वात लोकप्रिय आणि सदाबहार पर्याय आहे. विशेषतः लग्नातील भरजरी साड्यांपासून बनवलेले लेहेंगे हे एखाद्या ब्रँडेड आउटफिटसारखे दिसतात. साडीची लांबी ५ ते ६ वार असल्याने लेहेंग्याला भरपूर 'कळ्या' किंवा मोठा घोळ देता येतो. साडीची मोठी बॉर्डर लेहेंग्याच्या खालच्या बाजूला लावल्यामुळे तो अधिक उठावदार दिसतो. साडीच्या ब्लाऊज पीसचा किंवा साडीच्या पदराच्या भागाचा वापर करून तुम्ही डिझायनर चोली शिवू शकता. पदराचा वापर केल्यास चोलीवर आपोआपच सुंदर वर्क येते. जर साडी नेट किंवा शिफॉनची असेल, तर साडीचाच एक भाग दुपट्टा म्हणून वापरता येतो. जर साडी सिल्कची असेल, तर तुम्ही त्यावर नेटचा कॉन्ट्रास्ट दुपट्टा घेऊन लूक पूर्ण करू शकता. लेहेंग्याला जास्त उठाव देण्यासाठी आतून 'कॅन-कॅन' (Can-can net) लावा. यामुळे तुमच्या जुन्या साडीचा लेहेंगा अगदी 'डिझायनर पीस' सारखा फुगीर आणि स्टायलिश दिसेल.
11 / 14
साध्या शिफॉन किंवा फ्लोरल साडीपासून सुंदर फ्लोई वन-पीस शिवता येतो. पार्टीवेअर लूकसाठी हा उत्तम पर्याय आहे. एखादी साधी शिफॉन किंवा फ्लोरल प्रिंटेड साडी असेल, तर त्यापासून तयार होणारा 'लॉन्ग गाऊन' तुमचा पार्टी वेअर लूक पूर्णपणे बदलून टाकू शकतो. शिफॉन आणि जॉर्जेट साड्या अंगासरशी बसतात, त्यामुळे त्यापासून बनवलेला वन-पीस तुम्हाला एक उंच आणि स्लिम लूक देतो. या गाऊनला तुम्ही 'मॅक्सी ड्रेस' सारखा लुक देऊ शकता. हातांसाठी 'बेल स्लीव्हज' किंवा 'बलोन स्लीव्हज' वापरल्यास तो अधिक ट्रेंडी दिसेल. गळ्यापाशी थोडी एम्ब्रॉयडरी किंवा साडीच्या पदराचा वापर करून 'हाय नेक' किंवा 'व्ही नेक' डिझाईन शिवता येईल. संध्याकाळच्या पार्ट्या, वाढदिवस किंवा फॅमिली गेट-टुगेदरसाठी हा वन-पीस अत्यंत कम्फर्टेबल आणि स्टायलिश पर्याय आहे. या फ्लोई गाऊनला अधिक सुंदर बनवण्यासाठी कंबरेवर एक स्टायलिश मेटॅलिक बेल्ट वापरा. यामुळे तुमच्या साध्या साडीच्या गाऊनला एखाद्या डिझायनर गाऊनसारखा 'प्रीमियम लूक' मिळेल.
12 / 14
साडीच्या प्लेन भागाचा वापर करून 'स्ट्रेट कट' कुर्ता शिवा आणि साडीच्या ठळक काठांचा वापर कुर्तीच्या खालच्या घेऱ्यावर, गळ्यावर आणि हाताच्या बाह्यांवर करा. यामुळे कुर्तीला एक अतिशय फॉर्मल आणि रिच लूक मिळतो. उरलेल्या साडीच्या कापडापासून घेरदार प्लाझो शिवता येतो. जर साडीला दोन्ही बाजूंनी बॉर्डर असेल, तर ती बॉर्डर प्लाझोच्या खालच्या बाजूला लावल्यास तो एखाद्या डिझायनर पॅन्टसारखा दिसतो. या सूटसोबत दुपट्टा घेण्याची गरज नाही, पण जर तुम्हाला हवा असेल तर साडीच्या उरलेल्या नेट किंवा शिफॉनच्या भागाचा एक छोटा स्टोल बनवू शकता. हा ड्रेस ऑफिस मीटिंग्सपासून ते सणासुदीपर्यंत सगळ्या प्रसंगी उठून दिसेल.
13 / 14
जुन्या साडीला मॉडर्न आणि फ्युजन लूक द्यायचा असेल, तर 'लॉन्ग स्कर्ट आणि क्रॉप टॉप सेट' हा एक अत्यंत स्टायलिश पर्याय आहे. विशेषतः काठपदराच्या किंवा सिल्कच्या साड्यांपासून बनवलेले स्कर्ट खूपच आकर्षक दिसतात. साडीच्या पूर्ण लांबीचा वापर करून तुम्ही एक मोठा घेर असलेला स्कर्ट तयार करू शकता. साडीची बॉर्डर स्कर्टच्या खालच्या बाजूला लावल्यामुळे त्याला एक पारंपारिक आणि वजनदार लूक मिळतो. या स्कर्टवर घालण्यासाठी तुम्ही साडीच्याच कापडाचा किंवा एखादा कॉन्ट्रास्ट रंगाचा साधा क्रॉप टॉप किंवा शर्ट शिवू शकता. जर स्कर्ट खूप भरगच्च असेल, तर टॉप साधा ठेवल्याने तुमचा लूक बॅलेन्स दिसतो.
14 / 14
आपण भरजरी काठ असणाऱ्या साडीचा असा पारंपरिक किंवा टिपिकल स्टाईलचा अनाकरली ड्रेस शिवू शकता. जो सणवार, लग्नकार्य अशा प्रसंगी सुंदर लूक देतो. साडीच्या काठाचा वापर केल्यास ड्रेस चारचौघीत अधिकच उठून दिसतो.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्ससाडी नेसणे