Join us   

बॉलिवूड अभिनेत्रींचे एक से एक महाग मंगळसूत्र; नाजूक-सुंदर मंगळसूत्रांचे पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 3:28 PM

1 / 8
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नुकतेच लग्न झाले असून त्यांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगली. यामध्ये आलियाच्या आगळ्यावेगळ्या मंगळसूत्राचीही विशेष चर्चा झाली. या मंगळसूत्राला असलेल्या वेगळ्या आकाराच्या चिन्हाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले.
2 / 8
कैतरीनानेही नुकतेच विकी कौशल याच्याशी लग्न केले. तिच्या मंगळसूत्राला काळ्या आणि सोन्याच्या मण्यांमध्ये दोन छोटे हिरे जोड़ल्याने एक क्लासी आणि हटके लूक आला होता. कैतरिनाच्या गळ्यात हे नाजूक मंगळसूत्र अतिशय छान खुलून दिसत होते. या मंगळसूत्राची किंमत थोडीथोडकी नाही तर तब्बल ५ लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे.
3 / 8
सोनम कपूर तिच्या गर्भधारणेवरुन चांगलीच चर्चेत आहे. तिचे बेबी बंपचे बरेच फोटो गेल्या काही दिवसांत आपल्यासमोर आले आहेत. २०१८ मध्ये आनंद आहुजाशी लग्न झालेल्या सोनमच्या मंगळसूत्राची किंमत ५५ लाख आहे. काळ्या मण्यांमध्ये मध्यभागी एक डायमंड असलेल्या या मंगळसूत्राला या दोघांच्या राशींची चिन्हे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या मंगळसूत्राचा लूक एकदम बदलला आहे.
4 / 8
प्रियांका चोप्राने निक जोनास याच्याशी लग्न केले असून तिचे मंगळसूत्रही सब्यासाचीने डिझाईन केलेले होते. या मंगळसूत्राची किंमत कोटीमध्ये असल्याचे बोलले जात आहे. तीन लहान खडे आणि खाली एक मोठा लोलक अशी या मंगळसूत्राची डिझाईन होती.
5 / 8
दिपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये खूप चर्चा झाली होती. दिपिकाचे मंगळसूत्र पाहायला अतिशय साधे आणि नाजूक वाटत असले तरी त्याची किंमत २० लाख रुपये आहे. दिपिका विविध पारंपरिक कार्यक्रमांत हे मंगळसूत्र घातलेली पाहायला मिळते.
6 / 8
प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याने अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्न केले. त्यानंतर या दोघांचे विमानतळावरील फोटो व्हायरल झाले होते. लाल रंगाच्या साडीमध्ये पत्रलेखाने घातलेले मंगळसूत्र त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. सब्यासाचीने डिझाईन केलेल्या या मंगळसूत्राची जोरदार चर्चा रंगली होती. यामध्ये वाघाचे चिन्ह असून ते ऑक्सिडाईजमध्ये असल्याचे पाहायला मिळते.
7 / 8
अनुष्का शर्मा हिने क्रिकेटपटू विराट कोहली याच्याशी लग्नगाठ बांधली. काळ्या मण्यांचे दोन पदर असलेल्या या मंगळसूत्राला खाली मोठे डायमंड पेंडंट आहे. तिच्या गळ्यात हे पेंडंट चमकताना दिसते. विराटने अतिशय प्रेमाने घातलेल्या या मंगळसूत्राची किंमत ५२ लाख रुपये इतकी आहे.
8 / 8
आपल्यापैकी अनेकांची आवडती अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले. त्यावेळी तिच्या मंगळसूत्राबाबतही बरीच चर्चा झाली होती. दोन पदरी काळे मणी असलेल्या या मंगळसूत्राला डायमंडचे अतिशय सुंदर पेंडंट आहे. या मंगळसूत्राची किंमत ४५ लाख असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स : फॅशनबॉलिवूडब्यूटी टिप्समेकअप टिप्स