Join us
Daily Top 2 Weekly Top 5

साडी १ - ड्रेस ७, जुन्या खणाच्या साडीतून शिवा ७ डिझायनर इंडो-वेस्टन ड्रेस, कमी बजेट- लूक स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2026 20:00 IST

1 / 9
जसा काळ बदलतो आहे तशाच फॅशनच्या पद्धती देखील बदलताना दिसत आहेत. कपाटात असलेली जुनी खणाची साडी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फक्त पारंपरिक काठ-पदर आणि नऊवारी किंवा सहावारी साडीच येते. फॅशनच्या जगात आता खण साडीचा एक नवा आणि मॉडर्न अवतार पाहायला मिळत आहे. जर आपल्याकडेही एखादी खणाची साडी असेल जी आता आपण नेस नसू तर ती फेकून देण्याऐवजी किंवा तशीच कपाटात ठेवण्याऐवजी आपण 'डिझायनर इंडो-वेस्टर्न' कपड्यांमध्ये करू शकता. (Khan saree transformation designs)
2 / 9
खण साडीचे कापड हे वजनाला हलके आणि दिसायला अतिशय रॉयल असते. साडीच्या काठांचा खुबीने वापर करून तुम्ही कॉर्सेट टॉप, पलाझो पॅंट, ऑफ-शोल्डर गाऊन किंवा अगदी स्टायलिश वेस्टकोट सुद्धा तयार करू शकता. पाहूया, एका साडीपासून सात डिझायनर ड्रेसेस बनवण्याच्या काही भन्नाट आयडिया! (Modern Indo-western outfits from traditional saree)
3 / 9
सध्या कॉर्सेट टॉप आणि प्लाझो पँटची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. हा बोल्ड आणि स्टायलिश इंडो-वेस्टर्न सेट आहे. यामध्ये साडीच्या काठाचा वापर करुन सुंदर कॉर्सेट- स्टाईल टॉप आणि समोर दोरी असते. तर यावर पलाझो पँट शिवता येते.
4 / 9
हाल्टर नेक क्रॉप टॉप आणि प्लाझो पँट हा सेट सणाच्या दिवशी किंवा पार्टीसाठी चांगला आहे. यामध्ये गळ्याभोवती बांधला जाणारा सुंदर क्रॉप टॉप शिवता येतो आणि खाली पलाझो पँट शिवता येते.
5 / 9
आपल्याला ऑफिस किंवा इव्हेंटसाठी फॉर्मल इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर वेस्टकोट स्टाईल टॉप आणि बेल-बॉटम पँट शिवा.
6 / 9
साडीपासून शिवलेला हा एक अतिशय ग्लॅमरस ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस. यामध्ये ड्रेसच्या पूर्ण लांबीवर रुचेस (Ruches) किंवा चुन घेतल्या जातात, ज्यामुळे शरीराला सुंदर आकार मिळतो. गळ्याच्या आणि बाह्यांच्या काठावर तसेच ड्रेसच्या खाली साडीचा काठ वापरल्यास ड्रेस अतिशय छान दिसतो.
7 / 9
टिअर्ड मॅक्सी ड्रेस हा एक अतिशय कॅज्युअल आणि कम्फर्टेबल आहे. यामध्ये वेगवेगळ्या लेयरला साडीच्या काठाने वेगळे केले आहे, ज्यामुळे ड्रेसला एक वेगळाच घेरा आणि लुक मिळतो.
8 / 9
साडीपासून शिवलेला हा एक सुंदर टिअर्ड स्कर्ट-टॉप सेट आहे. यामध्ये एक साधा हाल्टर नेक क्रॉप टॉप ज्यावर हेवी ट्रॅडिशनल नेकलेस घालून आपण लूक पूर्ण करु शकतो.
9 / 9
ऑफ-शोल्डर घेरेदार ड्रेस घातल्यास आपल्याला रिच लूक मिळेल. यामध्ये ड्रेसचा वरचा भाग (Bodice) फिटिंगचा तर खालच्या बाजूला मोठा घेरदार शिवला जातो. हा ड्रेस पार्टी किंवा फंक्शनसाठी बेस्ट आहे.
टॅग्स : फॅशनमहिलास्टायलिंग टिप्स