Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ऑफिसला जाताना, आज काय कपडे घालू ? असा प्रश्न पडतो, ऑफिसवेअर म्हणून ट्राय करा 'हे' १० हटके फॅशन ट्रेंड्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 21:30 IST

1 / 13
आपल्यापैकी प्रत्येकीला ऑफिसला जाताना दररोज एकच प्रश्न पडतो की, आज कपडे काय घालायचे? जीन्स-टॉप, सलवार-कुर्ती किंवा नेहमीचे फॉर्मल पॅंट-शर्ट घालणे अनेकदा कंटाळवाणे वाटू (officewear clothes for women) शकते. दररोज ऑफिसला जाताना, आपला लूक वेगवेगळा आणि फ्रेश फील होईल असाच असावा असं प्रत्येकीला नेहमी वाटतं. पण ऑफिसवेअर म्हटलं की काय घालावं? स्टायलिश दिसावं, प्रोफेशनल लूकही राहावा, आणि कम्फर्टही मिळावा या तिन्ही गोष्टी एकत्र साधणं कधी कधी अवघड होतं.
2 / 13
ऑफिसवेअर म्हणून नेहमीच्या त्याच त्या कपड्यांना पर्याय म्हणून कोणते आउटफिट्स (trendy office wear ideas for working women) ऑफिसमध्ये घालता येतील जे स्मार्ट, एलिगंट आणि कॉर्पोरेट लूकसाठी परफेक्ट आहेत ते पाहूयात.
3 / 13
तुमच्या ऑफिसवेअर वॉर्डरोबला एक फ्रेश आणि स्टायलिश मेकओव्हर देण्यासाठी असे काही भन्नाट आणि ट्रेंडिंग पर्याय आहेत, जे तुम्हाला प्रोफेशनल दिसण्यास मदत करतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि कामाच्या ठिकाणीही तुमची एक वेगळी स्टाईल स्टेटमेंट तयार करतील.
4 / 13
क्युलॉट पँट ही गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या खालपर्यंत लगेच संपणारी पँट असते तिची लेंथच तेवढी असते. याचबरोबर ही पँट लांबून दिसायला ती स्कर्ट सारखीच दिसते. या प्रकारच्या बॉटमवर आपण त्याच रंगाचा ट्युनिक टॉप किंवा शॉर्ट टॉप घालू शकता.
5 / 13
मिडी ड्रेस उंचीला गुडघ्याच्या खालपर्यंत असतो. बॉडी फिटिंगला बसणाऱ्या आणि फ्लोई अशा दोन्ही टाईपमध्ये हे मिडी ड्रेस अगदी ऑफिसवेअरला शोभून दिसतात. मिडी ड्रेसचे कव्हरेज सुंदर, व्यवस्थित आणि एकदम कम्फर्टेबल असते. त्यामुळे डेली वेअर आणि ऑफिसवेअरसाठी हा एक बेस्ट पर्याय ठरु शकतो. कॉटन, लिनन, डेनिमचे मिडी ड्रेस एक बेस्ट ऑप्शन आहे.
6 / 13
को - ऑर्ड सेट्स एकदम क्लासी आणि मॉडर्न लूक देतात. कंबरेपर्यंत फिट आणि स्ट्रेट कट पॅन्ट्ससोबत मॅचिंग टॉप परफेक्ट ऑफिस लूक देतात. को - ऑर्ड सेट्स सध्या फारच ट्रेंडी आहेत, दिसायला मॉडर्न आणि ट्रेडिशनल दिसणारे को - ऑर्ड सेट्स सुपरईझी आणि कम्फर्टेबल लूक देतात. शक्यतो, ऑफिसवेअरसाठी लिनन, कॉटन, रेयॉन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या को - ऑर्ड सेट्सची निवड करावी. याचबरोबर, यात पेस्टल शेड्स नक्की ट्राय करायला विसरू नका.
7 / 13
कंबरेला फिट आणि खाली घेरदार होत जाणारा मिडी स्कर्ट घ्या आणि तो बटन डाऊन टॉप किंवा इतर प्रकारच्या मिड लेंथ टॉपसोबत तुम्ही पेअर अप करु शकता.
8 / 13
ब्लेझर ड्रेसेस म्हणजे ब्लेझरच्या डिझाइनमध्ये तयार केलेले ड्रेसेस. हे अतिशय प्रोफेशनल आणि पॉवरफुल दिसतात, ज्यामुळे तुमचा ऑफिस लुक खूप आकर्षक दिसतो.
9 / 13
जंपसूट हा एक प्रकारचा संपूर्ण वनपीसच असतो, जो टॉप आणि बॉटम एकत्र शिवून तयार केलेला असतो. हे दिसायला ट्रेंडी, स्टायलिश आणि स्मार्ट दिसतात, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा लुक खूप स्टायलिश, आकर्षक दिसतो. पेस्टल टोन्स ऑफिससाठी बेस्ट.
10 / 13
प्लीटेड स्कर्ट्स आणि टॉप दिसायला क्लासी आणि एलिगंट दिसतात. हे वेगवेगळ्या लांबीमध्ये आणि रंगांमध्ये येतात, ज्यामुळे ऑफिस लुकला एक फॉर्मल पण फॅशनेबल टच मिळतो.
11 / 13
ड्रेप्ड टॉप्स हे टॉप्स दिसायला आकर्षक आणि आरामदायक असतात. यांची ड्रेपिंग स्टाईल तुमच्या लुकला एक वेगळा टच देते आणि हे फॉर्मल पॅन्ट किंवा स्कर्टसोबत चांगले दिसतात.
12 / 13
ऑफिसवेअर म्हणून आपण जीन्सऐवजी वेगवेगळ्या रंगांच्या आणि डिझाइनच्या वेल-फिटेड ट्राउजर्स निवडू शकता. या आरामदायक असतात आणि कोणत्याही फॉर्मल टॉप किंवा शर्टसोबत चांगल्या दिसतात.
13 / 13
पेपलम टॉप्स कमरेपाशी घेरदार असतात, जे तुमच्या लुकला एक स्टायलिश आणि आकर्षक आकार देतात. हे फॉर्मल पॅन्ट किंवा स्कर्टसोबत खूप छान दिसतात. `
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्समहिला