Join us   

ख्रिसमस पार्टीत काय ड्रेसिंग करायचं सुचत नाही ? सारा ते करीना, ७ अभिनेत्रींकडून घ्या आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 7:06 PM

1 / 8
सध्या सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक महिला शॉपिंग आणि घर सजवण्यात व्यग्र झालेत. ख्रिसमसमध्ये अधिक लोकं लाल रंगाचे पोशाख परिधान करण्यास प्राधान्य देतात. लाल रंग सांताक्लॉजला प्रिय असल्यामुळे ख्रिसमसमध्ये सुद्धा लाल रंगाचे पोशाख परिधान करतात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री ख्रिसमसला लाल रंगाचे वेस्टर्न ड्रेस परिधान करतात. या ख्रिसमसला आपण देखील त्यांच्यासारखे ड्रेस परिधान करू शकता. त्यांच्या ड्रेसचे काही आयडिया घेऊन वेस्टर्न आणि हटके लुक मिळवू शकता.
2 / 8
बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण सध्या आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा प्रत्येक लूक सोशल मिडीयावर चर्चेत येतो. ती रेड जॉर्जेट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते. आपण देखील हा कट आउट ड्रेस ख्रिसमसच्या निमित्ताने परिधान करू शकता.
3 / 8
अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते. आपण या ख्रिसमसनिमित्त हॉल्टर नेक बॉडीकॉन लॉन्ग ड्रेस परिधान करू शकता. यात तुम्ही उठून दिसाल.
4 / 8
साऊथ इंडस्ट्रीतील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना लाखो दिलो की धडकन बनली आहे. यात तिने रेड कलरचा शोर्ट ड्रेस परिधान केला आहे. यात ती सुरेख - सोज्वळ दिसत आहे.
5 / 8
चूलबुली गर्ल सारा अली खान आपले हटके फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. आपल्याला शोर्ट ड्रेस कॅरी करायचा असेल तर हा रेड ड्रेस बेस्ट आहे. तिने या साइड स्लिटशोर्ट ड्रेस परिधान केली आहे. यासह जॅकेट देखील उठून दिसत आहे.
6 / 8
अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या सोज्वळ अभिनयासाठी ओळखली जाते. ख्रिसमसनिमित्त आपण फ्लोर लेंथ ड्रेस कॅरी करू शकता. या ड्रेसवर मोठे इयरिंग खूप सुंदर दिसतील.
7 / 8
दिलबर गर्ल नोरा फतेही रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिजलिंग हॉट दिसत आहे. आपण देखील ख्रिसमस पार्टीसाठी हा लूक कॅरी करू शकता.
8 / 8
बॉलिवूडची बेबो करीना कपूर आपल्या हटके अदांसाठी ओळखली जाते. आपण या ख्रिसमसनिमित्त वन शोल्डर स्प्लिट ड्रेस ट्राय करू शकता. हा पार्टी वेयर हटके आणि कुल लूक देईल.
टॅग्स : बॉलिवूडफॅशन