Join us

Navratri 2025 : लहान मुलामुलींसाठी खास नवरात्र स्पेशल कुर्ते आणि घागराचोली-पाहा खास मुलांच्या कपड्यांचं कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 13:36 IST

1 / 10
नवरात्र जवळ आली की बाजार विविध प्रकारच्या कपड्यांनी भरुन जातो. मस्त सुंदर चनियाचोली असेल किंवा घागरा अगदी मस्त प्रकार पाहायला मिळतात.
2 / 10
लहान मुलांसाठी तर आजकाल व्हरायटी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. एकदम मस्त पॅटर्न मिळतात. लहान मुलींसाठी चनियाचोली तसेच मुलांसाठी खास गुजराथी कुर्ता आणि पायजामा मिळतो.
3 / 10
गुलाबी आणि निळं हे कॉम्बिनेशन लहान मुलांवर अगदी सुंदर दिसतं. तशीच चनियाचोली नक्की घ्या.
4 / 10
मुलांसाठी छान रेडीमेड धोतर आणि कर गुजराथी स्टाईल कुर्ता तसेच टोपी अगदी मस्त दिसते.
5 / 10
नवरात्रीच्या दिवसात मुलांसाठी कपडे असतातच, मात्र मुलांसाठीही अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध असतात.
6 / 10
काळ्या रंगाचा असा सुट मुलांवर एकदम उठून दिसेल. शिवाय कितीही नाचले तरी तो खराब दिसत नाही.
7 / 10
काळ्या घागऱ्यावर रंगीत पट्टीचे डिझाइन असलेला ड्रेस नक्कीच सुंदर दिसतो. नृत्य करताना आणखीच छान वाटतो.
8 / 10
लहान मुलींना गुलाबी रंगाची चनियाचोली एकदम सुंदर दिसेल. ओढणी टिपिकल स्टाईलमध्ये डोक्याला बांधायची.
9 / 10
रंगीबेरंगी असा घागरा लहान मुलींना अगदी क्युट लुक देतो. फार सुंदर दिसतो.
10 / 10
अगदीच लहान मुलींसाठी हलकासा या पॅटर्नचा ड्रेस मिळतो. त्याला छान घेर असतो. विविध रंगांचे कॉम्बिनेशन असते.
टॅग्स : नवरात्रीफॅशनखरेदीगरबा