Navari look Idea : लग्नात पैठणी नऊवारी नेसायची आहे? पाहा नवरीबाईंसाठी सुंदर ४ नऊवारी पैठणी...
Updated:September 10, 2025 18:31 IST2025-09-10T18:16:05+5:302025-09-10T18:31:13+5:30
Nauvari Paithani Saree For Bride : Nauvari Paithani saree for bride : bridal Nauvari Paithani saree designs : wedding Paithani Nauvari saree collection : best Paithani saree for bride : वधूसाठी खास पैठणी नऊवारी साडीचे पाहा ४ प्रकार, शोभून दिसेल असा देखणा लूक...

लग्नसमारंभात किंवा कोणत्याही खास प्रसंगी नऊवारी (best Paithani saree for bride) साडी नेसण्याची क्रेझ आजही कायम आणि तितकीच ट्रेंडिंगमध्ये आहे. नऊवारी साडी म्हटलं की, मराठमोळा आणि पारंपरिक लुक डोळ्यासमोर येतो. जर तुम्ही नऊवारीसाठी पैठणी साडी नेसण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य निवड करत आहात. पैठणीचा रॉयल आणि आकर्षक पोत नऊवारीच्या सौंदर्यात आणखी भर घालतो.
पण पैठणीचे अनेक प्रकार असल्यामुळे, नऊवारीसाठी नेमकी कोणती पैठणी (Nauvari Paithani Saree For Bride) निवडावी, असा प्रश्न पडू शकतो. प्रत्येक पैठणीचा पोत आणि विणकाम वेगवेगळे असते. आपण नऊवारीसाठी खास असलेल्या पैठणीच्या काही लोकप्रिय आणि उत्तम प्रकारांविषयी माहिती घेणार आहोत, ज्यामुळे नऊवारी साडी नेसण्यासाठी योग्य पैठणी साडीची निवड करणे सोपे होईल.
लग्नात नऊवारी साडी नेसण्याची परंपरा अजूनही तितकीच देखणी ( wedding Paithani Nauvari saree collection) आणि आकर्षक मानली जाते. त्यातही जर नऊवारीसाठी पैठणी निवडली तर वधूचे रूप अधिक उठून दिसते.
पैठणी साड्यांचे रंग, डिझाईन आणि विणकामात विविध प्रकार उपलब्ध असतात. लग्नात नऊवारी साडी नेसण्यासाठी पैठणीचे कोणते प्रकार सर्वाधिक शोभून दिसतील यासाठी काही खास पर्याय पाहूयात...
१. बालगंधर्व पैठणी :-
बालगंधर्व पैठणी म्हणजे पैठणी साड्यांमधील एक खास व नाजूक प्रकार, ज्याची लोकप्रियता पारंपरिक आणि राजेशाही लुकसाठी आहे. याच्या पदरावर व काठावर बारीक जरीची नक्षी असते, जी नेसताना अतिशय उठून दिसते. हलकी पण दिसायला दिमाखदार असल्यामुळे नऊवारीमध्ये नेसली तर ती अधिक शोभून दिसते. वधूचा पारंपरिक व सोज्वळ लुक उठावदार दिसण्यासाठी बालगंधर्व पैठणी परफेक्ट आहे. हलकी असल्याने नऊवारीसाठी नेसताना सोयीस्कर ठरते. जर तुम्ही लग्नात नऊवारी पैठणी नेसायचा विचार करत असाल, तर बालगंधर्व पैठणी हा एक राजेशाही आणि देखणा पर्याय ठरतो.
२. पेशवाई पैठणी :-
पेशवाई पैठणी ही पैठणीच्या पारंपरिक प्रकारांपैकी सर्वात राजेशाही व पारंपरिक प्रकार. लग्नसमारंभात, विशेषतः नऊवारी नेसायची असेल तर पैठणीचा हा प्रकार अतिशय आकर्षक व सुंदर दिसतो. या साडीवरील रेशीम विणकाम व जरी काम हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. रॉयल ब्लू, गडद हिरवा, मरून, जांभळा या रंगांत पेशवाई पैठणी जास्त उठून दिसते. वधूला पारंपरिक, राजेशाही आणि लक्षवेधी लुक दिसतो.
३. महाराणी पैठणी :-
महाराणी पैठणी हा पैठणी साड्यांचा सर्वात श्रीमंत, दिमाखदार आणि रॉयल प्रकार मानला जातो. लग्नसमारंभ, खास प्रसंग किंवा वधूने नऊवारी नेसायची असेल, तर महाराणी पैठणी उत्तम पर्याय आहे. या साडीवरील विणकाम व घनदाट जरी नक्षीकाम हे या साडीच सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांसोबत, ही पैठणी अधिक खुलून दिसते.
४. जरतारी पैठणी :-
जरतारी पैठणी हा पैठणी साड्यांचा सर्वात नाजूक, कलात्मक आणि आकर्षक प्रकार मानला जातो. लग्नसमारंभ, मुंज, खास सोहळे किंवा नऊवारी नेसायची असल्यास हा प्रकार अतिशय आकर्षक ठरतो. पदरावर आणि काठावर पोपट, मोर, कमळ यांसारखे नाजूक नक्षीकाम केलेले असते. वजनाने हलकी असल्याने नऊवारी नेसताना साडीचा हा प्रकार सोयीचा ठरतो. जर नऊवारीसाठी हलकी पण रॉयल दिसणारी पैठणी निवडायची असेल, तर जरतारी पैठणी हा उत्तम पर्याय ठरतो.