1 / 12'मंगळसूत्र' हा भारतीय स्त्रीच्या वैवाहिक आयुष्यातील महत्त्वाचा दागिना... काळ्या मण्यांसोबतच (Moti Design Mangalsutra Pattern) येणारे विविध पॅटर्न, स्टायलिश डिझाईन्स आणि ट्रेंडी पॅन्डन्ट्स आजकाल प्रत्येक स्त्रीला आकर्षित करतात. यातलाच एक सदाबहार आणि एलिगंट पर्याय म्हणजे मोती डिझाईनचे मंगळसूत्र.2 / 12मोत्यांची पांढरी, शुद्ध आणि राजेशाही झळाळी कोणत्याही मंगळसूत्राला (moti mangalsutra pattern) एक वेगळा क्लासी लुक देते. पारंपरिक साड्यांपासून ते मॉडर्न वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत मोती पॅन्डन्ट मंगळसूत्र प्रत्येक लूकला एक खास प्रकारचा उठाव आणते.3 / 12 मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्समध्ये एक पॅटर्न सध्या खूप लोकप्रिय ठरत आहे, तो म्हणजे मोती डिझाईन मंगळसूत्र. 4 / 12मोत्याचे सौंदर्य हे नेहमीच खास असते. मोत्याचा पांढरा शुभ्र रंग मंगळसूत्रातील काळ्या मण्यांना उत्तम प्रकारे पूरक ठरतो आणि एक क्लासी लुक देतो. हे पॅटर्न पारंपरिक आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम आहेत, जे तुम्हाला साडीपासून ते वेस्टर्न वेअर पर्यंत प्रत्येक आउटफिटवर शोभून दिसतात.5 / 12साध्या काळ्या मण्यांच्या चेनला मधोमध एकच, नाजूक मोत्याचा पेंडंट जोडलेला असतो, जो रोजच्या वापरासाठी उत्तम आहे.6 / 12पारंपरिक मंगळसूत्र पेंडंट भोवती बारीक मोत्यांचे नक्षीकाम केलेले असते, ज्यामुळे पारंपरिकतेला आधुनिक टच मिळतो.7 / 12पेंडंटमध्ये कुंदनचे स्टोन सेटिंग काम केलेले असते आणि त्याखाली किंवा बाजूला मोती लटकवलेले असतात, जे सणवार, खास प्रसंग किंवा लग्नकार्य यांसारख्या स्पेशल क्षणी अगदी शोभून दिसतात. 8 / 12जर तुम्हांला चंद्रकोर सारखे पारंपरिक डिझाईन आणि सोबत सुंदर, नाजूक असे मोती वर्क हवे असेल तर हे पॅटर्न अत्यंत सुरेख व देखणे दिसेल. 9 / 12नाकातील मोत्याच्या नथीसोबतच आपण गळ्यांतील मंगळसूत्राला नथीचे पेंडंट असणारं अशा सुंदर व हटके पॅटर्नच मंगळसूत्र नक्की पेअरिंग करुन घालू शकतो. नऊवारी साडी किंवा खास मराठमोळा लूक हवा असेल तर हे कॉम्बिनेशन अत्यंत उठून दिसेल. 10 / 12गळ्यातील मंगळसूत्रात नवऱ्याचे नाव किंवा 'आहो', 'नवरोबा' असे काही शब्द गुंफलेले हवे असतील तर आपण मोत्याचे नाजूक डिझाईन असणारे अशा प्रकारचे कस्टमाईज केलेलं मंगळसूत्र देखील विकत घेऊ शकता. 11 / 12थोडेसे लंबगोलाकार आकाराच्या मोत्यांचा वापर करुन डिझाईन केलेलं देखील खूप सुंदर दिसत. 12 / 12जर तुम्हांला नेहमीच्या पारंपरिक पॅटर्नमधील पेंडंट आणि भोवती मोत्यांचे नाजूक वर्क असणारे अशा डिझाईनचे भरीव मंगळसूत्र हवे असेल तर अशा अनेक डिझाईन्सचे मंगळसूत्र उत्तम पर्याय आहे.