Monsoon Special : ऑफिसवेअरसाठी कुर्तीचे खास कलेक्शन! ५ ट्रेण्डी पॅटर्न, जीन्स पलाझोवर दिसतील सुंदर
Updated:July 8, 2025 10:40 IST2025-07-08T10:35:46+5:302025-07-08T10:40:26+5:30
Monsoon ethnic wear: Monsoon office wear : ऑफिसवेअरसाठी काही ट्रेंडची कुर्तीचे खास डिझाइन्स.

ऑफिसला जाणाऱ्या महिलांना आज काय कपडे घालावे असा प्रश्न वारंवार पडतो. कपाटात ढीगभर कपडे असतात पण नेमके कोणते कपडे घालावे हे समजत नाही. पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाही म्हणून जास्त जाड आणि फुल स्लिव्हज असणारे कपडे घालणे कठीण होतात. (Monsoon ethnic wear)
ऑफिसला जाताना अधिक स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर आपण कुर्तीची निवड करु शकतो. कुर्ती ही पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम आहे. पावसाळ्यात हे लवकर सुकते आणि आपल्या फॅशनमध्ये अधिक भर घालते. पाहूया ऑफिसवेअरसाठी काही ट्रेंडची कुर्तीचे खास डिझाइन्स. (Monsoon office wear)
ऑफिसमध्ये रोज घालण्यासाठी आपण ए-लाइन कुर्ती निवडू शकतो. ही दिसायला अधिक स्टायलिश आहे. तसेच याच्या नेकलाइनमुळे आपला संपूर्ण लूक बदलतो.
स्मार्ट लूक हवा असेल तर आपण जॅकेट स्टाईल कुर्तीची निवड करु शकतो. हे आपण पलाझोसोबत घालू शकतो.
जाड बॉर्डर डिझाइन असलेली कुर्ती दिसायला अधिक सुंदर असते. आपण ही जुन्या साडीपासून बनवू शकतो. याला काठाची बॉर्डर देऊन त्याचा लूक अधिक सुंदर करता येईल.
सध्या साधी साईड स्लिट कुर्ती खूप ट्रेंडमध्ये आहे. ऑफिस वेअरसाठी हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो.
सध्या साधी साईड स्लिट कुर्ती खूप ट्रेंडमध्ये आहे. ऑफिस वेअरसाठी हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो.