Join us

दिवाळीसाठी घ्या खास 'कलरफुल' मीनाकारी बांगड्या! घरच्या लक्ष्मीचे हात दिसतात देखणे, पाहा डिझाइन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 17:32 IST

1 / 12
दिवाळीचा सण म्हणजे नुसता थाटमाट... दिवाळी सणानिमित्ताने, नवीन कपडे, सुंदर साड्या, आणि ज्वेलरीसोबत बांगड्यांना विशेष असे स्थान असते. नवीन कपडे, मॅचिंग ज्वेलरी आणि आकर्षक (Meenakari Bangles Design) ॲक्सेसरीजशिवाय दिवाळीचा आनंद पूर्ण होऊच शकत नाही.
2 / 12
जेव्हा आपण पारंपरिक पोशाख, जसे की साडी, लेहंगा किंवा (Rajasthani meenakari bangles) अनारकली घालतो, तेव्हा त्या लुकला परिपूर्णता येते ती बांगड्यांच्या खणखणाटाने! बांगड्या म्हणजे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आणि दिवाळीसारख्या सणासाठी तर त्या खास हव्याच...
3 / 12
जर तुम्ही या दिवाळीत बांगड्या विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या वेळी नेहमीच्या काचेच्या किंवा इतर डिझाईन्सच्या बांगड्यांऐवजी मीनाकारी डिझाईन्सच्या बांगड्या नक्की ट्राय करा. रंगीबेरंगी चकचकीत वर्क, राजस्थानी फिनिश आणि हँडक्राफ्टेड लूकमुळे या बांगड्या पारंपरिक पोशाखांवर अतिशय देखण्या दिसतात. साडी असो, लेहेंगा असो वा कुर्ता सेट या बांगड्या प्रत्येक लूकला राजेशाही आणि फेस्टिव टच देतात.
4 / 12
या मीनाकारी बांगड्या फक्त सुंदरच नाहीत तर हलक्या वजनाच्या, ट्रेंडी आणि वापरण्यासही सोयीस्कर असतात. या बांगड्यांचा लूक इतका हेव्ही आणि रॉयल असतो की हातात इतर काही घालण्याची गरजच लागत नाही.
5 / 12
मीनाकारी म्हणजे रंगांची एक अशी सुंदर कला, ज्यात धातूच्या पृष्ठभागावर विविध चकचकीत रंग भरून नक्षीकाम केले जाते. या बांगड्यांची आकर्षक रंगसंगती, गुंतागुंतीची कलाकुसर आणि शाही लुक इतका सुंदर असतो की, त्या नुसत्या घातल्या तरी तुमचा संपूर्ण लुक उठून दिसतो.
6 / 12
लाल, हिरवा, निळा, पिवळा यांसारख्या गडद आणि तेजस्वी रंगांच्या डिझाईन्समुळे मीनाकारी बांगड्या दिवाळीच्या रात्रीच्या रोषणाईत अधिक चमकतात.
7 / 12
बाजारात सोन्याचे पॉलिश, अँटीक फिनिश किंवा कुंदन जडवलेल्या मीनाकारी बांगड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
8 / 12
या बांगड्या केवळ तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर तुमच्या पारंपरिकतेला आधुनिकतेची सुंदर जोड देतात. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीच्या शॉपिंगमध्ये या सुंदर मीनाकारी बांगड्यांचा समावेश नक्की कराच...
9 / 12
मोत्यांच्या किनारीने सजवलेल्या या बांगड्या कोणत्याही सणासुदीच्या आउटफिटवर उठून दिसतात.
10 / 12
बांगडीच्या कडेला बारीक मोती आणि मध्यभागी मीनाकारीची नक्षी असलेले युनिक डिझाईन्स साध्य खूपच ट्रेंडी आहे.
11 / 12
बांगड्यांवर नाजूक फुलांच्या डिझाईन्सची मीनाकारी असेल तर बांगडीला अधिक सुंदर लूक येतो.
12 / 12
दिवाळीसाठी बांगड्या खरेदी करताना आऊटफिटच्या कलर थीमप्रमाणे मीनाकारी बांगड्यांचे रंग निवडा, त्यामुळे तुमचा संपूर्ण फेस्टिव लूक अजून आकर्षक आणि परिपूर्ण दिसेल.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स