Join us

मनिष मल्होत्रांच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री नेसल्या 'अशा' साड्या- कोणी झालं ट्रोल तर काहींवर नेटकरी फिदा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2024 13:36 IST

1 / 9
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. या पार्टीला दरवर्षीच आवर्जून सगळे स्टार उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत असतात. या पार्टीत अनेक अभिनेत्रींनी साडी नेसण्यास प्राधान्य दिले. पण कोणाला ट्रोलिंगचा भलताच सामना करावा लागला तर कोणाला नेटिझन्सकडून चांगलीच वाहवा मिळाली...
2 / 9
सुहाना खान हिने अशा पद्धतीची लाल साडी नेसली होती. प्लेन साडी आणि साडीच्याच रंगाचे हेवी वर्क असणारे ब्लाऊज असा तिचा लूक आकर्षक वाटत होता.
3 / 9
क्रिती सेननला अशा पद्धतीने साडी नेसल्यामुळे बरंच ट्रोल करण्यात आलं. पण प्लेन साडी आणि हेवी ब्लाऊज असा लूक एखाद्या पार्टीसाठी शोभून दिसू शकतो, हे यावरून लक्षात येतं..
4 / 9
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा नेहमीप्रमाणेच सुंदर बनारसी साडी नेसून पार्टीसाठी आल्या होत्या.
5 / 9
करिश्मा कपूरचा हा साधा पण तेवढाच आकर्षक लूकही अनेकांना आवडला. मोजके दागिने आणि सोबर मेकअप यामुळे करिश्मा खूपच सुंदर दिसत होती.
6 / 9
अनन्या पांडेला काही जणांनी ट्रोल केलं कारण दिवाळी पार्टीसाठी इतर सगळे रंग टाळून तिने पांढऱ्या साडीची निवड केली होती..
7 / 9
त्याच वेळी तिची मैत्रिण जान्हवी कपूर हिने मात्र पुन्हा एकदा असा देखणा लूक करून तिच्या चाहत्यांची मने जिंकून घेतली.
8 / 9
खुशी कपूरच्या साडीची खूपच चर्चा झाली. कारण तिच्या साडीचा प्रकार इतर सर्वांपेक्षा खूपच निराळा होता.
9 / 9
श्रद्धा कपूरने नेसलेली ऑर्गेंझा शिमर साडीही अनेकांना खूप आवडून गेली. त्या साडीवरचा तिचा देखणा ग्लॉसी मेकअप तिच्या सौंदर्याला चार चाँद लावणारा ठरला.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेमनीष मल्होत्रादिवाळी 2024