साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

Updated:October 10, 2025 10:01 IST2025-10-09T21:04:03+5:302025-10-10T10:01:38+5:30

Make anarkali dress from old cotton saree : Anarkali Dress Ideas : Reuse old saree fashion : काठापदराच्या साडीच्या बॉर्डरचा वापर अनारकली ड्रेस शिवण्यासाठी कसा करायचा, याचे खास आणि ट्रेंडी पॅटर्न पाहा...

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकीच्याच कपाटात वेगवेगळ्या प्रकारच्या काठापदराच्या (Make anarkali dress from old cotton saree) भरजरी साड्या हमखास असतातच. या साड्यांचे काठ थोडे मोठे आणि हेव्ही असल्याने आपण या साड्या फारशा नेसत नाही. काही खास प्रसंग, सणवार, कार्यक्रम असला तरच या साड्या कपाटांतून बाहेर निघतात, अन्यथा वर्षानुवर्षे या साड्या कपाटातच पडून असतात.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

या साड्यांचे जड, सोनेरी तसेच पारंपरिक नक्षीकाम असलेले काठ हे त्यांचे (Anarkali Dress Ideas) मुख्य वैशिष्ट्य असते. परंतु, याच आकर्षक आणि सुंदर अशा काठांचा वापर करून आपण साध्या कॉटन अनारकली ड्रेस सूटला उत्तम, पारंपरिक आणि रॉयल लूक देऊ शकता.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

हा फक्त साड्यांचा पुनर्वापर नाही, तर एक प्रकारची स्टाईल स्टेटमेंट आहे. कॉटनचा आरामदायकपणा आणि काठांचा पारंपरिक डौल यांचा सुंदर समन्वय या डिझाईन्समध्ये दिसतो. काठापदराच्या साडीच्या बॉर्डरचा वापर अनारकली ड्रेस शिवण्यासाठी कसा करायचा, याचे खास आणि ट्रेंडी पॅटर्न पाहूयात.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

१. काठापदराच्या साडीची हेव्ही आणि सुंदर बॉर्डर आपण, थ्री-फोर्थ स्लीव्हज वर लावू शकतो, यासाठी रुंद काठापदराची बॉर्डर वापरावी.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

२. अनारकलीच्या तळाशी संपूर्ण घेऱ्यावर बॉर्डर लावा. यामुळे ड्रेसला हेवी आणि फेस्टिव्ह लूक मिळतो.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

३. अनारकली ड्रेसच्या वरच्या भागाला आणि नेक पॅटर्नच्या कडेवर देखील आपण अशाप्रकारे साडीची बॉर्डर लावून तुमच्या साध्यासुध्या ड्रेसला सुंदर व आकर्षक लूक देऊ शकता.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

४. अनारकली ड्रेसला मॅचिंग किंवा काँट्रास्ट रंगाच्या शिफॉन किंवा कॉटन दुपट्ट्याच्या चारही बाजूला आपण साडीच्या काठाची बॉर्डर लावू शकता. यामुळे दुपट्टा देखील तितकाच उठून दिसेल व ड्रेसला अधिक छान लूक येईल.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

५. अनारकली ड्रेसच्या कंबरेच्या भागावर (जिथून घेर सुरू होतो) साडीच्या बॉर्डरचा वापर बेल्ट म्हणून करावा. यामुळे ड्रेस अधिकच खुलून दिसतो.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

६. साडीच्या पदरावर जर भरजरी, रेखीव आणि सुंदर असे नक्षीकाम असेल तर, आपण या पदराच्या कापडाचा वापर करून अनारकलीची घेर आणि बॉर्डर अधिक सुंदर करू शकतो.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

७. पांढऱ्या कॉटनच्या साडीपासून शिवलेल्या ड्रेसला लाल किंवा गोल्डन काठपदर साडीचा बॉर्डर लावल्यास असा अनारकली ड्रेस सणासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन होईल.

साडीचे भरजरी काठ देतात अनारकली ड्रेसला झक्कास लूक! साडीचा ड्रेस पाहून मैत्रिणी होतील जेलस...

८. काठापदरच्या साडीच्या बॉर्डरचा वापर करून शिवता येणारे अनारकली ड्रेस सूट तुम्हाला खास प्रसंगी नक्कीच शोभून दिसतील आणि चारचौघीत तुमच्या लुकला अधिक उठावदार दिसण्यास मदत करेल.