Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मराठी लग्नात पाहिजेच असा मराठमोळ्या दागिन्यांचा साज, बघा महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांची श्रीमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 14:31 IST

1 / 10
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. आता लग्नसराई म्हटलं की भरजरी साड्या आणि पारंपरिक दागिने आलेच.. जर तुम्हाला लग्नप्रसंगी अगदी पारंपरिक साज करायचा असेल तर पुढे सांगितलेल्या दागिन्यांपैकी काही प्रकार तुमच्याकडे असायलाच हवे..(maharashtrian jewellery)
2 / 10
नथ हा अस्सल मराठी दागिना. कोणताही मराठमोळा पेहराव नथीशिवाय पुर्ण होतच नाही..(traditional marathi jewellery)
3 / 10
गळ्यालगत असणारी ठुशी हा मराठी दागिना असा आहे जो कमी वजनामध्ये तयार होतो आणि शिवाय तो कोणत्याही वयोगटातल्या महिलांना शोभून दिसतो.(marathi jewellery for wedding)
4 / 10
चिंचपेटी हा मोत्याचा एकच दागिना गळ्यात पुरेसा ठरतो. एक चिंचपेटी घातली की गळा भरून गेल्यासारखा वाटतो.
5 / 10
नऊवारी किंवा काठपदर साडी नेसणार असाल तर त्यावर तन्मणी नक्की घाला. तो गळ्यात खूप साजेसा वाटतो.
6 / 10
लक्ष्मीहार हा देखील एक पारंपरिक दागिना. पुर्वी जवळपास प्रत्येक मराठी महिलांकडे लक्ष्मीहार असायचाच. लक्ष्मीची चित्रं कोरलेल्याा छोट्या छोट्या पत्त्या एकत्र करून हा हार तयार केला जातो.
7 / 10
बकुळीच्या नाजुक फुलांचा आकार असणारा बकुळी हार तर अगदी मोहक आणि पाहताक्षणीच आवडणारा आहे.
8 / 10
एकदाणी हा देखील एक पारंपरिक दागिना. हा दागिना देखील कमी वजनात तयार होतो आणि शिवाय भरगच्च दिसतो.
9 / 10
मराठी लग्न म्हटलं की हातात मराठी परंपरा सांगणारे तोडे हवेच. तोड्यांमध्येही आता कित्येक प्रकार मिळत आहेत.
10 / 10
पाटल्या आणि बांगड्यांशिवाय तर लग्नाचा समारंभ पुर्ण होतच नाही. हल्ली तर पाटल्यांमध्येही कित्येक आकर्षक प्रकार मिळत आहेत.
टॅग्स : शुभविवाहदागिनेस्टायलिंग टिप्सफॅशन