Join us

कायम दिसा माधुरी दीक्षितसारखं सुंदर आणि एलिगंट, पाहा माधुरीच्या साड्यांचे खास कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 16:13 IST

1 / 8
९० च्या दशकानंतर आजही अनेकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित हिट अभिनेत्री आहे. नेहमीच ती तिच्या सौंदयामुळे चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरसने चाहत्यांना भुरळ पाडण्यांची एकही संधी ती सोडत नाही. तिच्या सुंदर आणि सोबर साड्यांच्या रंगांनी महिलांना तिनं प्रेमातच पाडलं आहे. तिचा साडी लूक खूपच आकर्षक दिसतो. (Madhuri Dixit saree collection)
2 / 8
जर आपल्यालाही पार्टी, वाढदिवसाचे फंक्शन किंवा लग्नात कोणतेही साडी नेसावी हे कळतं नसेल तर माधुरीच्या साड्यांचे खास कलेक्शन पाहू शकता. या डिसेंट आणि सिंपल लूकने नवराही होईल खूश.(Madhuri Dixit saree inspiration for parties)
3 / 8
मखमली मरुन रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर गोल्डन रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घालू शकतो. यावर मोती किंवा स्टोनचा नेकपीस घ्या. साडीला शोभतील असे मोठाले कानातले घातले तर तुमचा लूक उठून दिसेल. (Traditional saree collection of Madhuri Dixit)
4 / 8
साटन फ्लोरल प्रिंटेड साड्या अनेकांना फार नेसायला फार आवडतात. या साड्यांमध्ये फारसे गरम होत नाही आणि कॅरी करण्यासाठीही सोप्या असतात. आपण जर प्रिंटेड फ्लोरल साडी नेसणार असू तर यावर प्लेन रंगाचा ब्लाऊज छान दिसेल. गळ्यात नेकलेस आणि लांब असे कानातले घातले तर आपण अधिक आकर्षक दिसू शकतो.
5 / 8
ग्लोडन टिशू साडी खरेदी करणार असाल तर यावर पूर्ण भरलेला ब्लाऊज शोभून दिसेल. यासोबत तुम्ही एका हातात बांगड्या, गळ्यात चौकर आणि कानात झुमके घालू शकता.उंच टाचाची सॅण्डल घालून आपल्या सौंदर्यात अधिक भर घाला.
6 / 8
आपल्याला काही ट्रेण्डी, स्टायलिश घालायचे असेल शिफॉनची साडी नेसू शकतो. यावर आपण पूर्ण भरलेले ब्लाऊज चॉइस घालू शकतो.
7 / 8
आपण एखाद्या फॅमिली फंक्शनला जाणार असू तर हिरव्या रंगाची डॉट असणारी बॉडरवाली साडी आपल्याला शोभून दिसेल. यावर गोल्डन स्टोनचा नेकलेस घालू शकतो. आपल्या रुपात अधिक भर घालता येईल.
8 / 8
हळदीला जाणार असाल तर मस्टर किंवा पिवळ्या रंगाची कांजीपुरम साडी बेस्ट दिसेल. हा साऊथ इंडियन लुक आपल्यावर शोभून दिसेल. यावर आपण गोल़्डन रंगाचे खास ज्वेलरी कलेक्शन तर हातात हिरव्या बांगड्या घालू शकतो.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणे