Join us
Daily Top 2 Weekly Top 5

काय सांगता, अजून नाही घेतलेत? पाहा वेलवेट क्रॉप टॉपचे ५ पॅटर्न, कॉलेज-ऑफिसात तुमच्याच स्टाइलची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2025 20:00 IST

1 / 7
सध्या फॅशनही केवळ कपडे घालण्यापुरता मर्यादित नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख बनली आहे. कॉलेजला जाणारी तरुणी असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारी महिला प्रत्येकीला स्टायलिश, कम्फर्टेबल आणि ट्रेंडी दिसायचं असतं.(velvet crop top designs)
2 / 7
थंडी किंवा पार्टी सिझनमध्ये काही कपडे असे असतात जे सहज घालता येतात. आपल्याला ते जबरदस्त लूकही देतात. तो म्हणजे वेलवेट क्रॉप टॉप. मऊ, चमकदार आणि रॉयल फिनिशमुळे वेलवेट टॉप्स नेहमीच लक्ष वेधून घेतात. पाहूयात वेलवेट क्रॉप टॉपचे काही पर्याय. (velvet crop top for women)
3 / 7
सध्या स्क्वेअर नेक पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे. या पॅटर्नमध्ये आपल्या गळ्याचा भाग सुंदरपणे हायलाइट होतो आणि लुकला क्लासी टच मिळतो. फॉर्मल पॅँट किंवा जीन्ससोबत हा टॉप एलिंगट दिसतो.
4 / 7
पफ स्लीव्हज हे फॅशन आणि फन यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन. वेलवेट टॉपसोबत पफ स्लीव्हज असल्यास टॉपला रॉयल आणि ट्रेंडी लूक मिळतो. कॉलेज गर्ल्ससाठी हा पॅटर्न अगदी खास आहे.
5 / 7
वी नेक पॅटर्न स्लिम लूक देतो. हा पॅटर्न परफेक्ट बॉडी लूकही देतो. ऑफिस वेअरसाठी हा पॅटर्न छान आहे. ट्राउझर्स किंवा पॅलाझोसह वी-नेक वेलवेट क्रॉप टॉप प्रोफेशनल लूक देतो.
6 / 7
फ्रंट नॉट किंवा टाय-अप वेलवेट क्रॉप टॉप हा प्रचंड लोकप्रिय ट्रेंड आहे. फ्रंट नॉट किंवा टाय-अप डिझाइनमुळे टॉपला कॅज्युअल आणि ट्रेंडी फील येतो. आपण हा टॉप कॉलेज, कॅज्युअल आऊटिंग किंवा फ्रेंड्ससोबत हा परफेक्ट पॅटर्न ठरतो.
7 / 7
कट स्लीव्हजसह वेलवेट टॉप स्टाईल करु शकतो. कॅज्युअल लूकसाठी आपण यासोबत पॅन्ट घालू शकतो.
टॅग्स : फॅशनमहिला