1 / 7लग्न हे प्रत्येक वधूच्या आयुष्यातील खास आणि महत्त्वाचा क्षण असतो. या दिवसासाठी साडी, लेहेंगा, मेकअप जितका महत्त्वाचा असतो तितकेच दागिने देखील. विशेषत: बांगड्या... बांगड्यांमध्ये हिरव्या, मोत्याच्या, टेम्पल ज्वेलरी, काचेच्या खूप प्रसिद्ध तर आहेतच पण कुंदन बांगड्या सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. (Kundan bangles for bride)2 / 7जर आपणही लग्नात काठाची साडी किंवा लेहेंगा घालणार असू तर कुंदन बांगड्यांचे लेटेस्ट पॅटर्न पाहा, जे आपल्याला राजेशाही लूक देतील. (Bridal kundan bangles)3 / 7सिंगल कुंदन बांगडी सगळ्यात जास्त लोकप्रिय ट्रेंड आहे. प्रत्येक महिलेला इंडो-वेस्टर्न किंवा भारतीय पारंपारिक लूकसह ही बांगडी जोडता येते. हे आपण सिल्क साड्या, बनारसी साड्या किंवा अनारकली सूटवर घालू शकता.4 / 7पारंपरिक पण आधुनिक कुंदन बांगड्या ह्या इंडो-वेस्टर्न ड्रेसेस किंवा साध्या कुर्ता-पलाझोसोबत घालता येतात. ज्यामध्ये आपल्याला सुंदर आणि ट्रेंडी लूक मिळतो. 5 / 7लग्न किंवा समारंभात भारी व सुंदर वर्क केलेले कुंदन बांगड्या घालू शकतो. हे कोणत्याही कपड्यांवर सहज सूट होतात. वधूच्या लेहेंगा किंवा भारी साडीसोबत एक शाही लूक देतात. 6 / 7कॅज्युअल किंवा हलक्या बांगड्या हव्या असतील तर साध्या कुंदन बांगड्या किंवा कॉन्ट्रास्टिंग काचेच्या बांगड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. 7 / 7कुंदन बांगड्यांचा सेट हा सगळ्या कपड्यांवर आणि प्रत्येक वयोगटातील महिलेवर शोभून दिसतो. यामध्ये काचेच वर्क केलेले असते.