नववधुसाठी कुंदन बांगड्यांचे ५ लेटेस्ट पॅटर्न! काठाची साडी असो वा लेहेंगा, सगळ्यावर शोभेल- दिसाल अगदी राणीसारख्या
Updated:December 15, 2025 20:00 IST2025-12-15T20:00:00+5:302025-12-15T20:00:02+5:30
Kundan bangles for bride: Bridal kundan bangles: Wedding bangles designs: आपणही लग्नात काठाची साडी किंवा लेहेंगा घालणार असू तर कुंदन बांगड्यांचे लेटेस्ट पॅटर्न पाहा

लग्न हे प्रत्येक वधूच्या आयुष्यातील खास आणि महत्त्वाचा क्षण असतो. या दिवसासाठी साडी, लेहेंगा, मेकअप जितका महत्त्वाचा असतो तितकेच दागिने देखील. विशेषत: बांगड्या... बांगड्यांमध्ये हिरव्या, मोत्याच्या, टेम्पल ज्वेलरी, काचेच्या खूप प्रसिद्ध तर आहेतच पण कुंदन बांगड्या सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. (Kundan bangles for bride)
जर आपणही लग्नात काठाची साडी किंवा लेहेंगा घालणार असू तर कुंदन बांगड्यांचे लेटेस्ट पॅटर्न पाहा, जे आपल्याला राजेशाही लूक देतील. (Bridal kundan bangles)
सिंगल कुंदन बांगडी सगळ्यात जास्त लोकप्रिय ट्रेंड आहे. प्रत्येक महिलेला इंडो-वेस्टर्न किंवा भारतीय पारंपारिक लूकसह ही बांगडी जोडता येते. हे आपण सिल्क साड्या, बनारसी साड्या किंवा अनारकली सूटवर घालू शकता.
पारंपरिक पण आधुनिक कुंदन बांगड्या ह्या इंडो-वेस्टर्न ड्रेसेस किंवा साध्या कुर्ता-पलाझोसोबत घालता येतात. ज्यामध्ये आपल्याला सुंदर आणि ट्रेंडी लूक मिळतो.
लग्न किंवा समारंभात भारी व सुंदर वर्क केलेले कुंदन बांगड्या घालू शकतो. हे कोणत्याही कपड्यांवर सहज सूट होतात. वधूच्या लेहेंगा किंवा भारी साडीसोबत एक शाही लूक देतात.
कॅज्युअल किंवा हलक्या बांगड्या हव्या असतील तर साध्या कुंदन बांगड्या किंवा कॉन्ट्रास्टिंग काचेच्या बांगड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
कुंदन बांगड्यांचा सेट हा सगळ्या कपड्यांवर आणि प्रत्येक वयोगटातील महिलेवर शोभून दिसतो. यामध्ये काचेच वर्क केलेले असते.