Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

Updated:September 30, 2025 19:36 IST2025-09-30T19:04:11+5:302025-09-30T19:36:15+5:30

latest gold jewellery designs for baby girl : Dasara Special Latest Gold Jewellery Designs for 1 Year Baby Girl : 1 year baby girl gold jewellery ideas : dasara special gold jewellery for kids : lightweight gold jewellery for baby girl : या दसऱ्याला लेकीसाठी १ ग्रॅम वजनात करता येतील असे सोन्याच्या दागिन्यांचे काही खास पर्याय आणि डिझाईन्स...

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

दसऱ्याचा सण म्हणजे सोने खरेदीचा महत्त्वाचा दिवस. दसऱ्याच्या शुभ (Dasara Special Latest Gold Jewellery Designs for 1 Year Baby Girl) मुहूर्तावर आपल्याकडे सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जर आपल्या घरात नवजात बाळ किंवा एक ते दोन वर्षांची गोंडस चिमुरडी असेल, तर तिच्यासाठी खास आणि वजनाने हलके (१ ग्रॅम) सोन्याचे दागिने खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

एक ते दोन वर्षांच्या लहानग्या चिमुरडीसाठी नाजूक, आरामदायक (latest gold jewellery designs for baby girl) आणि सहज काढता - घालता येतील असेच दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार उत्तम असतात. कमी वजनातही (१ ग्रॅममध्ये) सोन्याच्या दागिन्यांच्या अनेक सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स बाजारांत उपलब्ध आहेत, जे तुमच्या लेकीच्या सौंदर्यात भर घालतील आणि सणाची शोभा वाढवतील.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

या दसऱ्याला, तुमच्या गोंडस, छोट्या लेकीसाठी १ ग्रॅम वजनात कोणते नाजूक सोन्याचे दागिने करता येतील, याचे काही खास पर्याय आणि आकर्षक डिझाईन्स पाहूयात.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

अतिशय लहान आणि हलक्या वजनाचे गोल स्टड्स किंवा छोटे रिंग हा एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलींना टोचणार नाहीत, असे गोल कडा असलेले किंवा मागच्या बाजूने फिरकी नसलेले सहज - सोपे व नाजूक डिझाईन्स निवडावेत. लहान मुलींच्या कानांत रिंग किंवा वेगवेगळ्या नाजूक डिझाईन्सचे कानातले खूपच सुंदर दिसतात.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

अगदी बारीक, साधी सोन्याची तार वापरून केलेले बारीक कडे किंवा मण्यांचे ब्रेसलेट देखील चिमुकलीच्या हातांवर शोभून दिसते. छोटाशा मनगटावर ते व्यवस्थित बसावे म्हणून ॲडजस्टेबल (Adjustable) किंवा थोडी जागेची (Space) सोडून तयार केलेलं डिझाईन किंवा कडे उत्तम ठरतात.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

१ ग्रॅम वजनात बारीक सोन्याची साखळी किंवा अतिशय लहान घुंगरू असलेली कंबरसाखळी देखील लहान मुलींसाठी सोन्याच्या दागिन्याचा उत्तम पर्याय आहे. नवजात बाळांसाठी किंवा १ वर्षापर्यंतच्या मुलींसाठी हा एक दागिन्याचा पारंपारिक पर्याय शोभून दिसेल. हा दागिना वजनात हलका असल्याने त्यांना त्रास होत नाही.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

लेकीसाठी आपण सिंगल बारीक एक पदरी साधी साखळी किंवा छोटं, नाजूक पेंडंट देखील १ ग्रॅममध्ये तयार करुन घेऊ शकता. लहान मुलींना पेंडंटच्या कडा टोचणार नाहीत याची काळजी घ्या. ही चैन खूप लांब नसावी, जेणेकरून खेळताना ती अडकणार नाही.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

लहान, नाजूक व बारीक नक्षीकाम केलेली गोलसर व हलकी अंगठी चिमुकल्या बोटांसाठी अगदी योग्य पर्याय आहे.

Dussehra 2025 : दसऱ्याला लाडक्या लेकीसाठी घ्या १ ग्रॅम वजनाचे नाजूक दागिने! पाहा चिमुकले सुंदर डिझाइन्स...

तुमच्या चिमुरडीसाठी तुम्ही १ ग्रॅम वजनाचे छोटे ब्रेसलेट देखील तयार करून घेऊ शकता. यामध्ये सोन्याचे ५ ते ६ अतिशय बारीक मणी वापरले जातात आणि ते एका मजबूत रेशमी दोऱ्यात ओवले जातात. साधे, नाजूक, टिकाऊ आणि १ ग्रॅम वजनात उत्तम दिसते. दोरा असल्याने ते ॲडजस्टेबल करणे सोपे होते.