Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सेफ्टी पिन विसरा! डिझायनर साडी पिनमुळे साडीला मिळेल शाही लूक - चारचौघीत साडीचा लूक होईल सुपरहिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2025 21:19 IST

1 / 12
साडी हा प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमधील एक खास आणि पारंपरिक पोशाख आहे. साडी (latest designer saree pins or saree brooch) कितीही सुंदर असली तरी तिला योग्य प्रकारे 'पिनअप' करणे तितकेच महत्त्वाचे असते, कारण एक छोटीशी पिनही तुमच्या साडीचा संपूर्ण लूक बदलू शकते. फक्त साडी सांभाळण्यासाठीच नाही, तर तिच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीही साडी पिन्सचा वापर केला जातो.
2 / 12
साडी नेसताना पदर नीट सावरण्यासाठी पिन लावणं गरजेचं असतं, पण आता ही गरजच फॅशन स्टेटमेंट बनली आहे. साध्या सेफ्टी पिनऐवजी आकर्षक आणि डिझायनर साडी पिन वापरल्यामुळे साडीचा लूक अधिक एलिगंट, ट्रेंडी आणि रॉयल दिसू लागतो.
3 / 12
पारंपरिक, मॉडर्न, टेम्पल ज्वेलरीपासून किंवा पर्ल-स्टोन वर्क असलेले वेगवेगळे डिझायनर साडी पिन सध्या फॅशनमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत. साडीचा पदर खास उठून दिसावा आणि संपूर्ण लूकला वेगळाच शाही लूक यावा यासाठी कोणते डिझायनर साडी पिन पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत, ते पाहूयात...
4 / 12
कुंदन वर्क असलेले साडी पिन लग्न समारंभ आणि सणांसाठी परफेक्ट पर्याय ठरतात. विविध रंगांच्या कुंदन आणि चमचमत्या स्टोन्सने सजवलेल्या पिन्स तुमच्या साध्यातल्या साध्या साडीलाही उठावदार लूक देतात. या प्रकारात पिकॉक डिझाइन', 'फ्लोरल पॅटर्न', 'हंस डिझाइन' अधिकच सुंदर दिसतात.
5 / 12
मोत्यांच्या नाजूक डिझाइनमुळे साडीला क्लासिक आणि एलिगंट टच मिळतो.
6 / 12
देवदेवतांच्या नक्षीकामासह असलेले हे पिन पारंपरिक साड्यांवर खास शोभून दिसतात. जाळीदार डिझाईन्स किंवा पारंपरिक आकृत्या कोरलेल्या पिन्स काठापदराच्या किंवा टिपिकल कॉटनच्या साडीला सुंदर आणि सोबर लूक देतात.
7 / 12
फुलांच्या आकारातील साडी पिनमुळे साडीला फ्रेश आणि फेमिनिन लूक मिळतो. यात वेगवेगळ्या आकाराची, रंगांची फुल असलयाने साडी अधिक सुंदर आणि देखणी दिसते. कृत्रिम फुलांनी किंवा कापडाच्या फुलांनी सजवलेल्या पिन्स किंवा लेस, बीड्स यांचा वापर करून तयार केलेल्या पिन्स नाजूक व प्रत्येक साडीला शोभून दिसतात. यातही 'गुलाब', 'कमळ' यांसारख्या मनमोहक फुलांचे डिझाइन अधिक खास दिसतात.
8 / 12
रंगीत स्टोन वर्क असलेले पिन साध्या साडीलाही ग्लॅमरस लूक देतात.
9 / 12
साध्या पण स्टायलिश डिझाइनचे पिन ऑफिस वेअर किंवा कॅज्युअल साड्यांसाठी परफेक्ट मॅच ठरतात.
10 / 12
जुना, रॉयल लूक देणारे अँटिक साडी पिन सिल्क आणि कॉटन साड्यांवर उठून दिसतात.
11 / 12
चांदीचा मुलामा दिलेल्या किंवा ऑक्सिडाइज्ड फिनिश असलेल्या मेटल पिन्स देखील क्लासी लूक देतात.
12 / 12
या प्रकारात आपण आपल्याला हवे तसे मनपसंत कस्टमाईज्ड डिझाईन्स असलेल्या साडी पिन खास तयार करुन घेऊ शकतो. लग्न, बारसं, डोहाळेजेवण यांसारख्या खास प्रसंगी आपण असे कस्टमाईज्ड डिझाईन्स असलेले थीम-बेस्ड पिन्स साडीला लावून आपल्या लुकला अधिक खास करु शकतो.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स