Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अजरख प्रिंटेंड साडीचे ५ लेटेस्ट डिझाइन्स! डेली वेअर, पार्टी - ऑफिससाठी सुंदर पर्याय, दिसाल झक्कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2025 17:54 IST

1 / 7
भारतीय साड्यांमध्ये अजरख प्रिंटेंड साड्यांची वेगळी ओळख आहे. गुजरात-राजस्थान सीमेलगत आणि कच्छ परिसरातून आलेली ही हातछाप कला आज फॅशनविश्वात नव्या अंदाजात पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. (Ajrakh printed saree)
2 / 7
कुर्ते, दुपट्टे किंवा शॉलपुरती मर्यादित असलेली अजरख प्रिंट आता साड्यांमध्येही तितकीच लोकप्रिय ठरते आहे. जर आपल्यालाही अजरख प्रिंटेंड साडी हवी असेल तर पाहा ५ लेटेस्ट डिझाइन्स. (Ajrakh saree designs)
3 / 7
डेली वेअरसाठी आणि ऑफिससाठी कॉटन अजरख साडी हा चांगला पर्याय आहे. अतिशय कम्फर्टेबल असल्यामुळे वापरण्यासाठी बेस्ट आहे. साध्या ब्लाऊजसोबत ही साडी फारच एलिगंट दिसते.
4 / 7
पार्टी, सण किंवा खास कार्यक्रमासाठी सिल्क अजरख साडी ही परफेक्ट आहे. यात आपल्याला रिच टेक्स्चर आणि डार्क रंग मिळेल. ज्यामुळे साडीला शाही लूक येतो.
5 / 7
बॉर्डरवर अजरख प्रिंट आणि संपूर्ण साधी असलेली साडी ऑफिस आणि फॉर्मल कार्यक्रमांसाठी चांगला लूक देते. मिनिमल लूक आवडणाऱ्यासाठी हा पर्याय चांगला आहे.
6 / 7
दोन रंगातून तयार झालेली ड्युअल शेड अजरख साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. ऑफिस किंवा कार्यक्रमात ही सहज वापरता येते.
7 / 7
पारंपरिक प्रिंटसोबत आधुनिक कट, पल्लू डिझाइन आणि ब्लाऊज स्टाइल असलेली मॉडर्न पॅटर्न अजरख साडी तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. इंडो-वेस्टर्न लूकसाठी हा खास पर्याय आहे.
टॅग्स : फॅशनमहिला