1 / 7नवनवीन फॅशन आणि बदलत्या ट्रेंडमुळे महिला दररोज त्यांच्या लूकमध्ये भर घालत असतात. त्यात ट्रेंडी आउटफिट्स असो किंवा स्टायलिश सॅण्डल असो. शोभतील असेच आउटफिट्स त्या निवडतात. (saree and kurti footwear ideas)2 / 7साडी असो किंवा कुर्ती प्रत्येक फॅशनवर कोल्हापुरी साज नेहमीच शोभून दिसतो. ही शैली अनेक वर्षांपासून महिलांच्या मनावर राज्य करत आहे. जाणून घेऊया कोल्हापुरी चप्पलचे एथनिक आणि क्लासी लूक्स. (Kolhapuri chappal style tips)3 / 7फॅन्सी स्टाईल सॅण्डल घालायला आवडत असेल तर ज्वेलरी स्टाइल कोल्हापुरी चप्पल आपण निवडू शकतो. आपली कुर्ती साधी असेल तर ही सॅण्डल शोभून दिसेल. 4 / 7फुलांनी सजलेली कोल्हापुरी चप्पल या प्रकारची डिझाइन खूप स्टायलिश आणि अनोखी असते. सलावर सूटसोबत अशी चप्पल आपण घालू शकतो. 5 / 7जर आपल्याला बोहो लूक हवा असेल तर कोल्हापुरी स्लिपर डिझाइन निवडू शकता. जीन्स, कुर्ती अशा अनेक कपड्यांवर शोभून दिसते. 6 / 7लेस वर्क कोल्हापुरी चप्पल ही डिझाइन्स आपल्याला बाजारात अनेकदा पाहायला मिळाली असेल. कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनमध्ये आपण घालू शकतो. 7 / 7फ्रिल स्टाईल कोल्हापुरी चप्पल ही आपण इंडो-वेस्टर्न स्टाईलमध्ये कॅरी करायला सोपी आहे. तसेच आपण याला जीन्ससोबत देखील घालू शकतो.