1 / 17महाराष्ट्रीयन पारंपरिक सौंदर्याला एक वेगळीच ओळख देणाऱ्या कॉटनच्या खण साड्या म्हणजे साधेपणातलं अप्रतिम सौंदर्य. हलकं, आरामदायी आणि तरीही अत्यंत एलिगंट असलेलं हे साडीचं रूप प्रत्येक महिलेला खास लूक देतं. पारंपरिक खणाच्या नक्षी, आकर्षक बॉर्डर आणि रंगांच्या सुंदर कॉम्बिनेशनमुळे या साड्या पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे सण-समारंभ, पूजा, हळदीकुंकू किंवा अगदी ऑफिस वेअर म्हणूनही कॉटन खण साड्या परफेक्ट ठरतात. सध्या ट्रेडिशनलसोबत मॉडर्न टच असलेल्या खण साड्यांची क्रेझ महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. साधेपणातही रॉयल आणि क्लासी लूक देणाऱ्या काही सुंदर कॉटन खण साडी डिझाईन्स पाहूयात, ज्या तुमचा पारंपरिक अंदाज आणखी खुलवू शकतात.2 / 17महाराष्ट्राच्या मातीतील पारंपारिक वसा लाभलेली 'खण साडी' आजच्या आधुनिक फॅशन जगात पुन्हा एकदा अधिराज्य गाजवत आहे. एकेकाळी केवळ चोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या खण कापडाने आता साडीच्या रूपात महिलांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. 3 / 17विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात किंवा सण-समारंभाला 'ट्रेडी' पण 'कम्फर्टेबल' लूक हवा असल्यास कॉटन खण साडी हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो.4 / 17खणाची तीच पारंपारिक नक्षी, पण कॉटनच्या मुलायम कापडामुळे ही साडी नेसायला अतिशय सुटसुटीत आणि दिसायला अत्यंत सुंदर वाटते.5 / 17पारंपरिक लूकला एलिगंट आणि क्लासी टच देणाऱ्या कॉटनच्या खण साड्या सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आल्या आहेत. हलक्या, आरामदायी आणि आकर्षक डिझाईन्समुळे या साड्या महिलांच्या खास पसंतीस उतरतात.6 / 17पारंपरिक खणाच्या बॉर्डरपासून ते मॉडर्न पॅटर्नपर्यंत अनेक सुंदर डिझाईन्स आज बाजारात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे सण, पूजा, फॅमिली फंक्शन किंवा अगदी कॅज्युअल वेअर म्हणूनही कॉटन खण साड्या परफेक्ट ठरू शकतात.7 / 17खण साडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे उठावदार रंग आणि चकाकणारी नक्षी. पूर्वी मोजक्याच रंगात मिळणारा हा प्रकार आता प्रत्येक रंगाच्या शेड्समध्ये उपलब्ध आहे.8 / 17तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून तुम्ही योग्य रंगाची खण साडी निवडली, तर तुमचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.9 / 17सिंपल कॉटन साडीवर कॉन्ट्रास्ट खण ब्लाऊज पेअर केल्यास संपूर्ण लूक आकर्षक दिसतो.10 / 17हलकी आणि साधी खण डिझाईन असलेली साडी ऑफिस किंवा डेली वेअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.11 / 17पारंपरिक नऊवारी ड्रेपमध्ये खण साडी अधिक रॉयल आणि हटके दिसते.12 / 17कॉटन खण साडीसोबत सिल्व्हर ज्वेलरी पेअर केल्यास पारंपरिक आणि क्लासी लूक पूर्ण होतो.13 / 17हलक्या, मऊसूत आणि दिवसभर आरामदायी वाटणाऱ्या कॉटन खण साड्या जितक्या साध्या दिसतात, तितक्याच त्या परिधान केल्यानंतर एलिगंट आणि रॉयल लूक देतात.14 / 17खण साडी आता फक्त साध्या काठापुरती मर्यादित राहिलेली नाही. विणकाम, पोत आणि डिझाईनमध्ये झालेल्या बदलांमुळे खण साडीमध्ये आता अनेक वैविध्यपूर्ण प्रकार पाहायला मिळतात.15 / 17साडीच्या पदराला लावलेले रेशमी गोंडे साडीला एक मॉडर्न लूक देतात.16 / 17आरामदायी फॅब्रिक, खणाच्या सुंदर नक्षी, हटके रंगसंगती आणि पारंपरिक बॉर्डरमुळे या साड्या प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसतात. 17 / 17पूजा, सण-समारंभ, हळदीकुंकू, श्रावणातील कार्यक्रम किंवा अगदी ऑफिसमधील एथनिक डे… प्रत्येक ठिकाणी या साड्या सहज उठून दिसतात. साध्या लूकमध्येही रॉयल टच देण्याची खासियत कॉटन खण साड्यांमध्ये पाहायला मिळते. त्यात सिल्व्हर ज्वेलरी, ऑक्सिडाईज दागिने, अंबाड्यावरचा गजरा आणि कपाळावर छोटीशी टिकली यांची जोड मिळाली की संपूर्ण लूक आणखी खुलून दिसतो.