शाहरुखच्या लेकीलाही कफ्तान कुर्तीने केलं दिवानं, पाहा कफ्तान कुर्तीचे १० पॅटर्न! तुम्हीही व्हाल फिदा, दिसाल रॉयल!
Updated:December 18, 2025 18:38 IST2025-12-18T18:24:20+5:302025-12-18T18:38:09+5:30
kaftan kurti trendy patterns & design : latest kaftan kurti designs : stylish kaftan kurti patterns : kaftan kurti for women : सध्याच्या स्टायलिश फॅशनमध्ये, कंफर्टसोबतच स्टाईलही हवी असेल, तर 'कफ्तान कुर्ती' हा परफेक्ट पर्याय ठरतो.

फॅशनच्या दुनियेत ट्रेण्ड्स येतात आणि जातात, पण काही स्टाईल्स मात्र 'एव्हरग्रीन' ठरतात. सध्या बी-टाऊनच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये 'कफ्तान स्टाईल कुर्ती' कमालीची लोकप्रिय होताना दिसत आहे. मग तो अनुष्का शर्माचा सुटसुटीत आणि एलिगंट 'एअरपोर्ट लूक' असो किंवा सुहाना खानचा स्टायलिश आणि मॉडर्न 'कॅज्युअल अवतार' – कफ्तान कुर्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींपासून प्रत्येकीला या कुर्तीच्या सुटसुटीतपणाची आणि रॉयल लूकची भुरळ पडली आहे. विशेष म्हणजे, आरामदायी असूनही हा आऊटफिट तुम्हाला झटपट 'हाय-फॅशन' लूक देतो(kaftan kurti trendy patterns & design).
फॅशन बदलत असली तरी आरामदायी आणि एलिगंट कपड्यांची क्रेझ कधीच कमी (stylish kaftan kurti patterns) होत नाही, आणि याच कारणामुळे कफ्तान कुर्ती आजच्या महिलांची पहिली पसंती बनली आहे. सैलसोट डिझाइन, हलकं फॅब्रिक आणि आकर्षक पॅटर्न्समुळे कफ्तान कुर्ती घालताच लूक ग्रेसफुल दिसतो. घरात आरामासाठी असो किंवा बाहेर स्टायलिश लूकसाठी कफ्तान कुर्ती प्रत्येक प्रसंगाला साजेशी ठरते. सध्याच्या स्टायलिश फॅशनमध्ये, कंफर्टसोबतच स्टाईलही हवी असेल, तर 'कफ्तान कुर्ती' हा परफेक्ट पर्याय ठरतो. फॅशन ट्रेंडमध्ये, सध्या कफ्तान कुर्तीची प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे.
सुटसुटीत, आरामदायी आणि तितकीच स्टायलिश दिसणारी ही कुर्ती आजकाल प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे कफ्तान कुर्ती ही केवळ कॅज्युअल वेअर म्हणून नाही, तर पार्टी, ऑफिस किंवा प्रवासासाठीही उत्तम पर्याय ठरते. कोणत्याही प्रकारचा बॉडी टाईप असणाऱ्या महिलांना ही कुर्ती शोभून दिसते, हेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य...
तुम्ही विंटर आऊटिंगचा विचार करत असाल किंवा एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी, कफ्तान कुर्ती तुम्हाला एक 'रॉयल' आणि 'एफर्टलेस' लूक देते. कफ्तान कुर्तीचे विविध पॅटर्न्स आणि ते कसे स्टाईल करावे याची झक्कास फॅशन पाहूयात.
'कफ्तान' हा मुळात मिडल ईस्टमधून आलेला पारंपरिक पोशाख असून, त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सैल, फ्लोई आणि आरामदायी रचना... कफ्तान कुर्तीमध्ये सरळ किंवा थोडासा A-लाइन कट, रुंद स्लीव्ह्ज आणि मिनिमल स्टिचिंग असते. कफ्तानचा मूळ पॅटर्न हा सैल असतो, ज्यामुळे तो घालणाऱ्याला कमालीचा आराम मिळतो. कफ्तानच्या बाह्या शरीराच्या कापडालाच जोडलेल्या असतात ज्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लो मिळतो.
हे पॅटर्न्स शॉर्ट कुर्ती, गुडघ्यापर्यंतच्या कुर्ती किंवा अगदी लाँग मॅक्सी गाऊन स्वरूपातही उपलब्ध आहेत. सिल्क, शिफॉन, जॉर्जेट आणि कॉटन अशा सर्व प्रकारच्या फॅब्रिकमधील कफ्तान खूप सुंदर दिसतात.
फ्लोरल, जिओमेट्रिक किंवा बोटॅनिकल प्रिंट्स असलेल्या कफ्तान कुर्ती रोजच्या वापरासाठी आणि कॅज्युअल आउटिंगसाठी परफेक्ट ठरतात. रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी कॉटन कफ्तान हा सर्वात आरामदायी पर्याय आहे. प्रिंटेड पॅटर्न्स यामध्ये खूपच उठून दिसतात.
गळ्याजवळ किंवा स्लीव्ह्जवर हलकी एम्ब्रॉयडरी असलेली कफ्तान कुर्ती फेस्टिव्ह आणि स्पेशल ओकेजन्ससाठी सुंदर दिसते.
जर तुम्हाला कफ्तानला थोडा 'फिटेड' लूक द्यायचा असेल, तर कमरेला स्टायलिश बेल्ट लावा. यामुळे तुमचा लूक अधिक मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसेल.
सिल्क, सॅटन किंवा शिमरी फॅब्रिकमधील कफ्तान कुर्ती पार्टीवेअर किंवा इव्हनिंग लूकसाठी खूपच एलिगंट दिसते.
एकसारख्या रंगातील कफ्तान कुर्तीवर मिनिमल डिझाइन असले तरी त्या खूप क्लासी आणि रॉयल लूक देतात.
कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी शॉर्ट कफ्तान आणि जीन्सचे कॉम्बिनेशन एकदम कूल वाटते. इंडो-वेस्टर्न लूकसाठी हा बेस्ट पॅटर्न आहे.
आधुनिक कट्स, इंडो-वेस्टर्न टच आणि रंगसंगतीमुळे स्टायलिश कफ्तान कुर्ती पॅटर्न्स सध्या ट्रेंडमध्ये असून, त्या प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसतात.