1 / 8चेहर्याचा आकार सगळ्यांचा वेगवेगळा असतो. काहींचा चेहरा लांबट असतो तर काहींचा गोल असतो. खरेतर आपण कोणत्या पॅटर्नचे रंगाचे कपडे घालतो हे ठरवताना विविध गोष्टींचा विचार करतो. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे चेहर्याचा आकार. 2 / 8एखाद्याच्या चेहर्याचा आकार त्याच्या ड्रेसिंगवर नक्कीच परिणाम करु शकतो. अनेक जणांचा चेहरा गोल असतो. त्यामुळे चेहरा फुगलेला किंवा जाड दिसतो. मात्र गोलाकार चेहरा असल्यावर योग्य नेक पॅटर्नचे कपडे घालून लूक एकदम मस्त करता येतो. 3 / 8चेहरा गोल असेल तर काही पॅटर्न वापरणे टाळा. कारण त्यामुळे चेहरा आणखी फुगीर दिसतो. मग काही जणींचा आत्मविश्वास कमी होतो. योग्य प्रकारचे कपडे वापरणे नक्कीच मदत करते. 4 / 8फुल नेक पॅटर्न आजकाल फार प्रसिद्ध आहे. फक्त ब्लाऊज नाही तर टॉप्स आणि ड्रेसमध्येही हा पॅटर्न आहे. मात्र जर चेहरा गोलाकार आहे तर हा पॅटर्न सुंदर दिसण्याऐवजी त्यामुळे चेहरा सुजलेला दिसतो. हा पॅटर्न वापरणे टाळा. 5 / 8तसेच मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने बोटनेक प्रकार जरी छान दिसला तरी असा ब्लाऊज चेहरा फुगीर असल्याचे भासवतो. सगळ्यांनाच तो पॅटर्न शोभत नाही. 6 / 8खरंतर डिप नेक हा प्रकार गोलाकार चेहऱ्यावर शोभून दिसतो. चेहर्याचा आकार मोठा असल्याने असे पॅटर्न छान वाटतात. 7 / 8गोलाकार गळ्याचा ड्रेस गोलाकार चेहऱ्यावर अजिबात छान वाटत नाही. त्यामुळे चेहरा वयापेक्षा जास्त मोठा दिसायला लागतो. तरुण मुलींनी खास असा पॅटर्न टाळावा. गळ्या लगत गोलाकार असा पॅटर्न करण्यापेक्षा पान, हार्ट असे शेप द्या. 8 / 8व्ही नेक शेप गोलाकार चेहरा असेल तर नक्कीच सुंदर दिसेल. वापरुन पाहायला हरकत नाही. डीप व्ही घ्या किंवा लहान कट असलेला वापरा. छानच वाटेल.