साडी नेसण्याच्या १० नव्या स्टाईल, यंदाच्या लग्नसराईत दिसाल उठून - साडीत खुलून येईल सौंदर्य...
Updated:May 2, 2025 09:30 IST2025-05-02T09:25:00+5:302025-05-02T09:30:02+5:30
Learn to drape 10 different types of saree draping styles : Saree drapes ideas : 10 Different Saree Draping Styles : 10 Different Types of Modern & Traditional Saree Wearing : How to wear saree in different styles for a wedding : Drape Your Saree in 10 Different Beautiful Style : नेहमीच्या त्याच त्या पद्धतीने साडी नेसण्यापेक्षा, ट्राय करा या हटके आणि ट्रेंडिंग नव्या पद्धती...

उन्हाळा आला की सोबतच लग्नसराईचा सिझन देखील (Learn to drape 10 different types of saree draping styles) सुरु होतो. लग्नात अनेकजणी शक्यतो ठेवणीतल्या (How to wear saree in different styles for a wedding) खास भरजरी साड्या नेसतात. परंतु आपण साडी नेसताना आपल्या नेहमीच्या त्याच ठरलेला पद्धतीने साडी नेसतो.
परंतु यंदाच्या लग्नसराईत काहीतरी वेगळं ट्राय करायची (Different Types of Modern & Traditional Saree Wearing) इच्छा असेल तर, आपण साडी या नव्या वेगवेगळ्या १० पद्धतीने देखील नेसू शकतो. एकच साडी आपण १० वेगवेगळ्या पद्धतीने कशी नेसू शकतो ते पाहूयात.
१. रेट्रो स्टाईल साडी ड्रेपिंग :-
साडी नेसण्याची ही सर्वात जुनी पद्धत आजही तितकीच ट्रेंडिंग आहे. ९० च्या दशकातील अभिनेत्री अशा पॅटर्नने साड्या नेसत असे. आपण लग्नाची पार्टी किंवा रिसेप्शनमध्ये अशा प्रकारे रेट्रो स्टाईलने साडी ड्रेपिंग करु शकतो.
२. लेहेंगा स्टाईल साडी ड्रेपिंग :-
लेहेंगा स्टाईल साडी ड्रेपिंग या पद्धतीमध्ये साडी अशा प्रकारे ड्रेप केली जाते की पाहताना, आपण लेहेंगा घातला आहे असे वाटते. साडीला अशा पद्धतीने नेसवतात की त्याचा पायघोळ लेहेंगा तयार होतो. जर तुम्हाला वजनाने जड असणारे लेहेंगा घालणे कठीण वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे साडी ड्रेप करून लेहेंगा लूक सहजपणे मिळवू शकता.
३. मरमेड स्टाईल साडी ड्रेपिंग :-
मरमेड स्टाईल साडी ड्रेपिंग या पद्धतीने साडी नेसल्यास ती खालच्या बाजूने थोडी निमुळती होत जाते. यामुळे तुम्ही या प्रकारच्या साडीमध्ये बारीक दिसता. साडी ड्रेपिंगचा हा प्रकार देखील अतिशय सुंदर दिसतो. तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनला अशा पद्धतीने फॅन्सी साडी ड्रेप करु शकता.
४. बटरफ्लाय स्टाईल साडी ड्रेपिंग:-
साडी ड्रेपिंगचा हा प्रकार थोडाफार लेहेंगा स्टाईल साडी ड्रेपिंग सारखाच दिसतो. सध्या रफल पॅटर्नच्या साड्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत, या साड्या जर तुम्ही बटरफ्लाय स्टाईलने ड्रेप केल्या तर तुमचा लूक अगदी सुंदर दिसतो.
५. नेक रॅप साडी ड्रेपिंग :-
नेक रॅप साडी ड्रेपिंग स्टाईलमध्ये साडीचा पदर दोन्ही खांद्यावरून घेऊन गुंडाळला जातो, आणि कंबरेजवळ पदर खोचला जातो. यामुळे पदर सावरत बसायचे टेंन्शन राहत नाही, तसेच तुम्हाला साडी नेसून वेस्टर्न लूक हवा असेल तर तुम्ही नक्कीच या स्टाईलने साडी ड्रेप करु शकता.
६. डबल पिल्लू साडी ड्रेपिंग :-
या पॅटर्नमध्ये दोन्ही खांद्यावर पदर काढले जातात. जर तुम्हाला साडीचा पदर आणि एखादी भरजरी ओढणी किंवा शाल असे दोन्ही एकत्रित घ्यायचे असेल तर तुम्ही डबल पिल्लू स्टाईलने साडी ड्रेपिंग करु शकता.
७. धोती स्टाईल साडी ड्रेपिंग :-
या प्रकारात साडी नेसताना ती धोती स्टाईलने नेसली जाते. साडी नेसल्यावर ती धोतर सारखी दिसते. याचबरोबर साडी नेसल्यावर चालताना त्रास होऊन नये किंवा फारशी सावरत बसू नये असे वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारची साडी नेसू शकता.
८. स्कार्फ स्टाईल साडी ड्रेपिंग :-
एखादा स्कार्फ आपण जसा मानेभोवती गुंडाळतो त्याचप्रमाणे, या साडीचा पदर देखील मानेभोवती गुंडाळून साडीला वेस्टर्न लूक दिला जातो. तुम्ही एखादया पार्टीसाठी अशा प्रकारची साडी स्टाईल करु शकता.
९. बेल्टेड केप साडी ड्रेपिंग :-
नेहमीप्रमाणे साडी नेसून तुम्ही त्यावर कंबरेभोवती साडीला शोभेल असा बेल्ट लावू शकता. सध्या ही साडी ड्रेपिंगची पॅटर्न फारच ट्रेंडिंगमध्ये आहे.
१०. पॅण्ट स्टाईल साडी ड्रेपिंग :-
या पॅटर्नमध्ये तुम्ही चक्क तुमच्या जीन्स पॅण्टवर साडी ड्रेप करु शकता. साडी नेसल्यावर जर तुम्हाला इंडोवेस्टर्न लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे पॅण्ट स्टाईल साडी ड्रेपिंग करु शकता.