Join us

पलाझोच नाही, सिगारेट पँट- सूटमध्ये दिसाल बॉस लेडी, पाहा ५ हॉट स्टाइल्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 09:30 IST

1 / 7
फॅशनमध्ये सध्या पँट-सूट एक क्लासिक आउटफिट आहे, पण आता पारंपरिक पलाझो किंवा वाइड लेग पँटच्या जागी सिगारेट पँट-सूटने लोकप्रियता मिळवली आहे. (Women’s cigarette pants)
2 / 7
सिगारेट पँट म्हणजे स्ट्रेट कट पण फिटेड लूक देणारी पँट. यामुळे पाय अधिक स्लिम आणि उंच दिसतात. ऑफिस लूक असो वा पार्टी, सिगारेट पँट-सूट व्यक्तिमत्व अधि कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसतं. पाहूयात ५ पर्याय (Stylish pant suit for women)
3 / 7
जर आपल्याला फेस्टिव्हल सीझनमध्ये हटके आणि स्टायलिश कपडे घालायचे असतील तर प्रिटेंड आणि शेड्स असलेले कपडे निवडा. यातील स्टोन वर्क अधिक सुंदर लूक देतो.
4 / 7
सध्या सैल फिट कुर्ता खूप ट्रेंडमध्ये आहे. हे सिगारेट पँटसह अधिक चांगले दिसते. आपण विविध डिझाइन्सनुसार खरेदी करु शकतो.
5 / 7
जर आपल्याला पारंपरिक लूक हवा असेल आणि काही वेगळे ट्राय करायचे असेल तर देसी लूकसाठी सिगारेट पँट आणि गोल फ्रॉक घालू शकता.
6 / 7
लेस वर्क सूट हा चांगला पर्याय आहे. यात आपण शिफॉन किंवा जॉर्जेटपासून बनवलेला सूट खरेदी करु शकतो. ज्यावर सुंदर वर्क केलेले असेल.
7 / 7
स्टायलिश लूकसाठी हॉल्टर नेकलाइन असलेला कुर्ता सेट खरेदी करु शकता. यात बेसिक सिगारेट पँट खूप स्टायलिश लूक देईल.
टॅग्स : फॅशनमहिला