Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ऑफिस असो वा आउटिंग! उन्हाळ्यात घाला ५ प्रकारचे कम्फर्टेबल मिडी ड्रेस; मिनिटांत मिळेल 'क्लासी' लूक- घामही येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2026 11:23 IST

1 / 7
उन्हाळ्यात आपल्याला कडक ऊन आणि घामामुळे जड कपडे घालणं नकोसं वाटतं. अशावेळी आपण कॉटनचे हलके-फुलके कपडे घालतो. पण बरेचदा ड्रेस किंवा इतर कपड्यांमुळे आपल्या घाम येतो. अंग चिकट लागते. ऑफिस किंवा आउटिंगच्या वेळी जीन्स किंवा इतर कपडे घालणंही नकोसं वाटतं. तर अशावेळी आपण मिडी ड्रेस असा पर्याय निवडू शकतो. डघ्याच्या खाली आणि घोट्याच्या थोडा वर असणारी या ड्रेसची लांबी 'ऑफिस वेअर' (Office Wear) आणि 'आउटिंग'साठी बेस्ट आहे. (Summer Midi Dresses)
2 / 7
जर आपल्यालाही ऑफिस किंवा आउटिंगसाठी मिडी ड्रेस हवा असेल तर हे ५ पॅटर्न बेस्ट ठरतील. (Office Wear for Women)
3 / 7
कॉटन शर्ट स्टाईल मिडी हा ड्रेस ऑफिससाठी सगळ्यात बेस्ट मानला जातो. कॉटनचे कापड घाम शोषून घेते आणि शरीराला थंडावा देते याला कंबरेला बेल्ट लावून फॉर्मल लूकही करता येतो. पांढरा, आकाशी किंवा पेस्टल रंगांमधील शर्ट ड्रेस उन्हाळ्यात अतिशय कूल दिसतात.
4 / 7
बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा कॅज्यूअल लूकसाठी फ्लोरल प्रिंट्स खूप छान दिसतील. याचे कापड कॉटनचे असते त्यामुळे जास्त उकाडा देखील जाणवणार नाही. यासोबत साधे सँडल्स आणि हलकी ज्वेलरी घातल्यास मिनिटांत क्लासी लूक मिळेल.
5 / 7
ज्यांना सैल आणि घेरदार कपडे आवडत असतील तर त्यांच्यासाठी ए-लाईन मिडी ड्रेस चांगला आहे. हा ड्रेस कंबरेपासून खाली थोडा घेरदार असतो.
6 / 7
टियर मिडी ड्रेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे ड्रेस दिसायला खूपच सुंदर आणि स्टायलिश वाटतात. फिरायला जाताना किंवा ब्रंच डेटसाठी एक परफेक्ट पर्याय आहे.
7 / 7
लिनन मिडी ड्रेस हे उन्हाळ्यासाठी सर्वात प्रीमियम कापड मानले जाते. ऑफिस मीटिंग्ससाठी डार्क रंगाचे लिनन मिडी ड्रेसेस नक्की ट्राय करा.
टॅग्स : फॅशनमहिला