Join us

Blouse Designs :काठपदराची साडी नेसल्यावर काकूबाई दिसता? ७ लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स- दिसाल सुपर स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 16:56 IST

1 / 9
काठपदराच्या साड्या पारंपरिक लूक देणाऱ्याच असतात. पण अनेक जणींना असं वाटतं की काठपदराची साडी नेसल्यावर त्या खूपच काकुबाई टाईप किंवा ऑल्ड फॅशन दिसतात. काही जणींना पारंपरिक दागिने घालून ट्रॅडिशनल लूक करणे आवडते. पण काही जणींना मात्र माॅडर्न लूक हवा असतो.(how to stich blouse on traditional silk saree?)
2 / 9
आता तुम्हालाही काठपदर साडीवर थोडा मॉडर्न स्टायलिश लूक करायचा असेल तर ब्लाऊज डिझाईन्स थोडे बदलायला हवे. त्यासाठी नेमके कोणते ब्लाऊज डिझाईन्स सध्या ट्रेंडींग आहेत ते पाहा..(latest fashion blouse designs for traditional saree)
3 / 9
अशा पद्धतीचं स्लिव्हलेस ब्लाऊज काठपदर साडीवर घातल्यास तुमच्या लूकला नक्कीच एक माॅडर्न टच मिळेल.
4 / 9
पुर्वी नेटच्या बाह्या असणारं ब्लाऊज फक्त डिझायनर साडीवर घातलं जायचं पण आता मात्र काठपदर साड्यांवरही नेटचं ब्लाऊज घालण्याची फॅशन आली आहे.
5 / 9
मागच्या बाजुने अशा पद्धतीचा गळा शिवणं हल्ली खूप ट्रेडिंग आहे. अशा प्रकारचं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं.
6 / 9
मागचा गळा पुर्णपणे बंद आणि अशा पद्धतीचं डिझाईन असंही ब्लाऊज शिवून पाहा. एकदम स्टायलिश दिसाल. हवं तर या प्रकारच्या ब्लाऊजच्या बाह्या तुम्ही स्लिव्हलेसही घेऊ शकता.
7 / 9
काठपदर साड्यांच्या ब्लाऊजवर अशा पद्धतीचं वर्क करून घेण्याची फॅशन अजूनही आहे. आता तर यात आणखी सुंदर आणि नाजूक डिझाईन्स करून दिले जातात.
8 / 9
पैठणी साडीवर जर ब्लाऊज शिवायचं असेल तर त्यावर असं देखणं वर्क करून घ्यायला हरकत नाही. यामुळे तुमची महागडी पैठणी आणखीनच श्रीमंती थाटातली दिसू लागते.
9 / 9
काठपदराच्या साडीवर तसंच टिपिकल काठपदराचं ब्लाऊज न शिवता अशा पद्धतीचं प्रिंटेड किंवा ब्रोकेडचं ब्लाऊज शिवण्याचीही हल्ली फॅशन आहे. कित्येक जणी तर पैठणीवरही असे ब्लाऊज शिवून घेतात.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणे