1 / 10'साडी' ही प्रत्येक महिलेसाठी खास आणि अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते, विशेषतः आवडती आणि महागडी साडी असेल तर तिची अधिक काळजी घेतली जाते. सण - समारंभात ही साडी नेसल्यावर जेव्हा चुकून त्यावर चहा, कॉफी, भाजीचा तेलकट किंवा कुंकवाचा डाग पडतो, तेव्हा काळजात धस्स होतं. अशा वेळी पहिली धाव घेतली जाते ती 'ड्रायक्लिनिंग'कडे. पण, प्रत्येक वेळी साडी ड्रायक्लिनिंगला देणं खिशाला परवडणारं नसतं आणि घाईच्या वेळी ते शक्यही नसते(easy tricks to clean saree at home).2 / 10कधी नकळतपणे साडीवर डाग पडले की आपण लगेच ती ड्रायक्लिनिंगला देतो, ज्यासाठी वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. मात्र, प्रत्येकवेळी ड्रायक्लिनिंगची गरज नसते. घरच्याघरी काही सोप्या आणि घरगुती उपायांच्या मदतीने आपण साडीवरील हट्टी डाग सहजपणे काढू शकता. योग्य पद्धत आणि थोडी काळजी घेतली, तर आपली साडी पुन्हा नव्यासारखी दिसू शकते...3 / 10आवडत्या सिल्क, पैठणी किंवा डिझायनर साडीवर पडलेले हे हट्टी डाग आता तुम्ही घरच्या घरीच घालवू शकता. घरच्या उपलब्ध साहित्याचा वापर करून साडीच्या कापडाला किंवा रंगाला इजा न पोहोचवता डाग कसे स्वच्छ करायचे? साडीची चमक कशी टिकवून ठेवायची? याच्या काही स्मार्ट ट्रिक्स....4 / 10साडीवर तेल पडल्यास लगेच त्या ठिकाणी टॅल्कम पावडर शिंपडा. काही वेळाने ती पावडर तेल शोषून घेते. नंतर हलक्या हाताने ब्रश करून काढा.5 / 10 एक कप पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळा आणि त्या मिश्रणाने डाग हलक्या हाताने पुसा. डाग हळूहळू फिकट होतात. व्हिनेगरप्रमाणेच आपण डागांवर थेट लिंबाचा रस लावून हलक्या हाताने रगडून डाग सहजपणे काढू शकतो. 6 / 10 कापसावर थोडे नेलपॉलिश रिमूव्हर घेऊन डागावर अलगद फिरवा. यासोबतच, आपण लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून डागावर लावा. काही वेळ ठेवल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा.7 / 10च्युइंगम चिकटले असेल त्या भागावर बर्फ चोळा, च्युइंगम कडक झाल्यावर ते सहज निघून येईल.8 / 10 हळदीचा डाग असल्यास बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ती डागावर लावा आणि काही मिनिटांनी धुवा. साडीवर जिथे हळद किंवा कुंकवाचा डाग पडला आहे, तिथे थोडे ताजे दही किंवा ताक व्यवस्थित लावा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने घासून साबण लावून साध्या पाण्याने धुवून टाका.9 / 10तुरटी पाण्यात विरघळवून ते पाणी डागांवर ओतून हलकेच चोळा. यामुळे घामाचे पिवळसर डाग कमी होतात.10 / 10 महागडी साडी धुताना डिटर्जंटऐवजी बेबी शाम्पू वापरा, यामुळे चमक कायम वर्षानुवर्षे जशीच्या तशी टिकून राहते.