1 / 7बहुतेक महिलांना आपल्या आयुष्यात कधी ना कधी ब्रा खरेदी करताना साईजबाबत मोठा गोंधळ होतो. साईज बरोबर असली तरी 'B' कप का 'C' कप असे प्रश्न नेहमी पडतात. चुकीची ब्रा घातल्याने पाठदुखी, खांद्यावर व्रण पडणे आणि स्तनांच्या स्नायूंना इजा होणे असे आरोग्याचे प्रश्नही पडतात. यामुळे परफक्टे फिटिंगसाठी फक्त नंबरच नाही तर कप साईज समजून घेणे महत्त्वाचे आहे. (Signs of wearing wrong bra size)2 / 7परफेक्ट ब्रा साईजमुळे स्तनांचा आकाराचा आणि शरीराची ठेवण यांचा योग्य मेळ जमतो. अनेकदा आपण दुकानात जातो. अंदाजाने एखादा नंबर सांगतो, पण घरी आल्यावर लक्षात येते की ती खूप घट्ट आहे किंवा कपमध्ये जागा उरते. चुकीच्या साईजमुळे आपला कॉन्फिडन्स तर कमी होतोच, पण कपडेही शरीरावर नीट दिसत नाहीत. (Difference between band size and bust size)3 / 7ब्रा साईजमध्ये दोन साईज असतात एक बँड साईज आणि दुसरी कप साईज. बँड साईज म्हणजे आपल्या छातीखालचा घेर आणि कप साईज म्हणजे स्तनांचा आकार. घरच्या घरी दोन्ही साईज टेपने कशी मोजायची याची सोपी पद्धत पाहूया. 4 / 7सर्वात आधी ताठ उभे राहून मेजरपट्टी आपल्या छातीखालच्या भागावर गुंडाळा. टेप जास्त घट्ट किंवा सैल नसावा. जर आपले माप सम संख्येत असेल तर ३०, ३२ किंवा ३४ तर तोच आपला बँड साईज आहे. जर आपले माप विषम संख्येत ३१, ३३, ३५ असं आले तर त्यात १ इंच मिळवून ती संख्या सम करा. 5 / 7बस्ट साईज मोजण्यासाठी टेप छातीच्या सर्वात उंच भागावरुन फिरवून घेर मोजा. हे माप घेताना टेप दाबू नका तो हलका ठेवा. 6 / 7आलेल्या बस्ट साईजमध्ये आणि बँड साईज यांची वजाबाकी करा. यांच्यात जो फरक पाहायला मिळेल त्यावरुन कप साईज ठरतो. 0 इंच फरक- AA कप, १ इंच फरक- A कप, २ इंच फरक- B कप, ३ इंच फरक- C कप, ४ इंच फरक- D कप, ५ इंच फरक- DD कप. 7 / 7म्हणजे असं की आपला बस्ट साईज ३४ इंच असेल आणि बँड साईज ३२ इंच असेल तर ३४-३२ = २ इंच फरक येतो. याचा अर्थ असा आपली परफेक्ट साईज ३२B ही आहे.