1 / 12आपल्यापैकी प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये तिच्या आई किंवा आजीच्या काळातील (how to make short tops from old cotton saree) काही सुंदर जुन्या ठेवणीतल्या कॉटन साड्यांचा खजिना असतोच. या कॉटनच्या साड्यांचा पोत आणि रंग खूप छान असतो, पण त्या फारशा नेसल्या जात नाहीत. अशावेळी या साड्या कपाटात तशाच पडून राहतात.2 / 12 पण आता या जुन्या साड्या टाकू नका, या साड्यांचा वापर करून तुम्ही (reuse cotton saree into stylish tops) अत्यंत फॅशनेबल, आरामदायक आणि जीन्सवर परफेक्ट दिसणारे शॉर्ट कुर्ते शिवू शकता. अशाप्रकारे आपण जुनी साडी फॅशनमध्ये पुन्हा वापरू शकतो आणि त्यातून स्टायलिश आणि ट्रेंडी शॉर्ट कुर्ते शिवून घेऊ शकतो. 3 / 12ही केवळ फॅशन रिसायकलिंग नाही, तर एकप्रकारे तुमच्या जुन्या (recycle old saree into modern short top) आठवणींना मॉडर्न लूक देण्याचा आगळावेगळा प्रयत्न आहे. तुमच्या ठेवणीतल्या साध्या कॉटनच्या साड्यांना ट्रेंडी शॉर्ट कुर्त्यांमध्ये स्टायलिंग करण्यासाठी कोणते हटके उपाय करता येतील, ते पाहा... 4 / 12 १. जुन्या कॉटन साडीला असणाऱ्या काठाचा किंवा बॉर्डरचा वापर करून आपण जीन्सवर घेण्यासठी शॉर्ट कुर्तीज शिवू शकतो. कुर्त्याच्या गळ्याभोवती बाहीच्या टोकावर किंवा हेमलाइनवर साडीच्या बॉर्डरचा वापर करावा. यामुळे साडीचा पारंपरिक लूक कायम राहतो आणि कुर्ता अधिक आकर्षक दिसतो. जर साडीला जाड काठ असेल, तर तो जॅकेट - स्टाईल कुर्त्याच्या ओपनिंगवर वापरता येतो.5 / 12२. दोन वेगवेगळ्या जुन्या साड्यांचे भाग एकत्र करून कुर्त्यावर युनिक पॅचवर्क करता येते. एका साडीचा मुख्य भाग घ्या आणि दुसऱ्या साडीच्या पदर किंवा बॉर्डरच्या भागाचे चौकोनी तुकडे करून कुर्त्यावर डिझाइन म्हणून वापरा. यामुळे कुर्ता एक डिझायनर आणि बोल्ड फॅशन पीस म्हणून उठून दिसतो.6 / 12३. शॉर्ट कुर्त्यासाठी ए-लाइन किंवा एम्पेअर कट पॅटर्न निवडा. या पॅटर्नमध्ये कुर्ता कमरेच्या भागातून थोडा लूज व मोकळा राहतो, जो जीन्सवर अधिक स्टायलिश दिसतो आणि उन्हाळ्यासाठी आरामदायक असतो.7 / 12४. कुर्त्याला ट्रेडिशनल आणि आकर्षक लुक देण्यासाठी डोरी वापरा. कुर्त्याच्या नेक पॅटर्नला डोरी लावून कुर्त्याला अधिक आकर्षक लुक देता येतो. साडीच्या रंगाशी मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टिंग रंगाची डोरी वापरु शकता. 8 / 12५. फॉर्मल आणि स्टायलिश लूकसाठी कॉटनच्या साडीचे कॉलर असलेले शॉर्ट कुर्ते देखील शिवू शकता, जे ऑफिसवेअरसाठी परफेक्ट मॅच होतात.9 / 12६. जर कॉटन साडीवर वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक व उठून दिसणारी प्रिंट असेल तर आपण अशा प्रकारचे शॉर्ट कुर्तीज शिवून घेऊ शकतो. ही प्रिंट तुमच्या कुर्त्याला हटके लूक देईल. 10 / 12७. काळ्या रंगाच्या कॉटनच्या साडीचा आपण असा एक छान शॉर्ट कुर्ता शिवू शकतो. हा काळ्या रंगाचा कुर्ता सगळ्या रंगांच्या जीन्सवर अगदी परफेक्ट मॅच होईल. 11 / 12८. कॉटनच्या साडीला जर छोटा आणि बारीक नक्षीकाम केलेला असा काठ असेल तर आपण अशा प्रकारचा शॉर्ट कुर्ता शिवून जीन्ससोबत पेअरिंग करु शकता. 12 / 12९. वेगवेगळ्या नाजूक व सुंदर प्रिंटेड कॉटनच्या साड्यांचे अशाप्रकारे शॉर्ट कुर्ते शिवून स्टायलिंग करु शकता.