1 / 12कॉटनच्या साड्या म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय! पण कॉटनची साडी नेसताना सगळ्यात मोठी कसरत असते ती म्हणजे त्यावरील सुरकुत्या घालवणे....साडी सुंदर दिसावी म्हणून आपण वारंवार कडक गरम इस्त्री करतो, पण यामुळे साडीचे धागे कमकुवत होतात, रंग फिका पडतो आणि हळूहळू साडी फाटू लागते(How to Make a Cotton Saree Look Crisp Without Ironing).2 / 12कॉटनच्या साड्या या हलक्या, आरामदायक आणि एलिगंट लूक देणाऱ्या असल्यामुळे (no iron cotton saree hacks) अनेक महिलांची पहिली पसंती असतात. परंतु अशा कॉटनच्या साड्यांना इस्त्री न केल्यास साडी सुरकुतलेली दिसते आणि नेसताना नीट प्लीट्स बसवणंही कठीण होतं.अशावेळी काही सोपे आणि घरगुती उपाय वापरून कॉटनच्या साड्यांना इस्त्री न करता देखील करकरीत, नीटनेटका आणि आकर्षक लूक देता येतो. जर तुम्हालाही तुमची आवडती कॉटन साडी इस्त्री न करता 'करकरीत' आणि 'फ्रेश' दिसावी असे वाटत असेल, तर काही खास टिप्स पाहूयात... 3 / 12 साडी धुताना ती कधीही वॉशिंग मशीनमध्ये टाकू नका किंवा जोरात पिळू नका. साडी धुतल्यानंतर ती हलक्या हाताने पाणी झटकून वाळत घाला. जास्त पिळल्यामुळे साडीवर खोलवर सुरकुत्या पडतात ज्या इस्त्रीशिवाय निघत नाहीत. साडी धुतल्यानंतर ती हलक्या हाताने झटकून घ्या आणि सावलीत सरळ पसरून वाळवा. टांगताना साडी व्यवस्थित ताणून लावा, त्यामुळे सुरकुत्या कमी पडतात.4 / 12 कॉटनची साडी अर्धवट सुकलेली असतानाच ती नीट पसरवून हँगरला अडकवा. हाताने साडीचे पदर आणि निऱ्या सरळ करा. ओलाव्यामुळे साडी स्वतःच्या वजनाने आपोआप सरळ होते आणि वाळल्यावर त्यावर सुरकुत्या दिसत नाहीत.5 / 12 एका स्प्रे बाटलीत पाणी घ्या आणि त्यात अगदी थोडं 'फॅब्रिक कंडिशनर्स' मिसळा. साडी नेसण्यापूर्वी ती हँगरला टांगून त्यावर हा स्प्रे हलकासा मारा आणि हाताने साडी प्रेस करा. ५ ते १० मिनिटांत सुरकुत्या गायब होतील.6 / 12 जर तुमच्याकडे वेळ असेल, तर गरम पाण्याने आंघोळ करताना साडी बाथरुममध्ये एका बाजूला हँगरला अडकवून ठेवा. गरम पाण्याच्या वाफेमुळे (Steam) साडीचे धागे सैल होतात आणि सुरकुत्या आपोआप निघून जातात.7 / 12 साडी पूर्ण वाळल्यानंतर ती बेडवर नीट पसरवा आणि हाताने दाब देऊन प्रेस करा. त्यानंतर त्याचे काठ व्यवस्थित जुळवून घडी घाला. या घडीवर जड वजनदार वस्तू किंवा गादीखाली ही साडी काही वेळ ठेवल्यास साडीला इस्त्री केल्यासारखा कडकपणा येतो.8 / 12धुताना पाण्यात थोडा लिक्विड स्टार्च किंवा तांदळाच्या पाण्याचा (मांड) वापर करा. त्यामुळे साडीला नैसर्गिक कडकपणा येतो आणि ती करकरीत दिसते.9 / 12 साडी पूर्ण कोरडी झाल्यावर तिला नीट घडी घालण्याऐवजी रोल करून ठेवा. यामुळे क्रिज पडत नाहीत आणि साडी सरळ राहते. हा रोल एका रात्रीसाठी ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी साडी उघडल्यावर त्यावर एकही सुरकुती दिसणार नाही आणि ती अगदी प्रेस केल्यासारखी वाटेल.10 / 12नेसताना प्लीट्स नीट हाताने सरळ करून काही मिनिटे क्लिप लावून ठेवा. त्यामुळे साडी अधिक नीटनेटकी दिसते.11 / 12 साडीला कांजी (Starch) घालताना त्या पाण्यात चिमूटभर मीठ टाका. मिठामुळे साडीला एक प्रकारची चमक येते आणि कांजी घातल्यावर साडी इस्त्री न करताही बराच वेळ कडक राहते.12 / 12 शेवटच्या धुण्याच्या पाण्यात १ चमचा व्हाईट व्हिनेगर घाला. यामुळे साबणाचे अंश निघून जातात, कापड मऊ राहते आणि सुरकुत्या कमी पडतात, त्यामुळे वारंवार इस्त्री करण्याची गरज भासत नाही.