Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आलिया भटप्रमाणे विसरा ‘लो हाईट कॉम्प्लेक्स!’ हिल्स न घालता उंच दिसण्यासाठी ५ टिप्स-दिसाल उंच स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 20:00 IST

1 / 8
बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्याची उंची कमी आहे. आलिया भट्ट, विद्या बालन, परिणीती चोप्रासारख्या अनेक अभिनेत्रींच्या मनात कमी उंची असल्याचा न्यूनगंड असतो. हिल्स घातल्याशिवाय आपण चांगल्या दिसत नाही. जीन्स, कुर्ती आपल्यावर शोभत नाही. असे विचार नकळत मनात येतात. पण खरं सांगायचं झालं तर उंच दिसण्यासाठी हिल्स हाच एकमेव मार्ग नसतो. (look taller without heels)
2 / 8
योग्य कपड्यांची निवड, रंगसंगती आणि थोडासा स्टायलिंग सेन्सवर भर दिला तर आपणही उंच दिसू शकतो. त्यासाठी कमी उंचीच्या मुलींनी या ५ स्टायलिंग टिप्स कायम लक्षात ठेवा. (height styling tips)
3 / 8
उंच दिसण्यासाठी कमी उंचीच्या मुलींनी नेहमी सरळ, वर-खाली रेषा असलेले कपडे निवडा. ज्यामुळे आपली उंची दिसते. शर्ट, पँट किंवा कुर्ता निवडताना पट्टेदार निवडा.
4 / 8
अनेकदा आपण खूप सैल किंवा जास्त आकाराचे कपडे घातल्याने आपली उंची कमी दिसू शकते. योग्य फिटिंगचे कपडे आपली उंची चांगली दाखवतात आणि आपणही स्मार्टही दिसतो.
5 / 8
खूप लांब कोट किंवा जॅकेट घातल्याने आपली उंची अधिक लहान दिसू शकते. त्यासाठी आपण कायम लहान आणि मध्यम लांबीचे जॅकेट घाला.
6 / 8
मोठ्या आकाराच्या बॅग किंवा अॅक्सेसरीजमुळे आपण अधिक लहान दिसू शकतो. स्लिम आणि कमीत कमी अॅक्सेसरीज निवडा.
7 / 8
व्ही- नेक टी- शर्ट, कुर्ती, फ्रॉक किंवा साधा शर्ट घातल्याने आपण उंच दिसू शकतो. कमी उंचीच्या मुलींनी गोल नेक असलेले कपडे घालणे टाळा.
8 / 8
उंच दिसण्यासाठी मोनोक्रोम ड्रेसेस निवडा. टॉप आणि पँट एकाच रंगाची निवडा. हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.
टॅग्स : फॅशनमहिला