1 / 9आपल्या वॉर्डरोबमध्ये असलेला एक साधा कुर्ता किती सुंदर आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करता येऊ शकतो, याची अनेकींना कल्पनाच नसते! तोच एक कुर्ता वेगवेगळे बॉटम, ज्वेलरी ॲक्सेसरीज आणि स्टायलिंगच्या मदतीने दरवेळी पूर्णपणे वेगळा लूक देऊ शकतो. फक्त योग्य कॉम्बिनेशन आणि काही सोप्या फॅशन टिप्स वापरल्या, तर तुमचा एकच कुर्ता ऑफिसपासून पार्टीपर्यंत आणि कॅज्युअलपासून फेस्टिव्ह लूकपर्यंत सहज वापरता येतो.2 / 9आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात किमान एक तरी असा 'फेव्हरेट' कुर्ता असतो, जो दिसायला साधा पण घालायला अतिशय कम्फर्टेबल असतो. अनेकदा आपल्याला वाटतं की, एकाच कुर्त्यावर तेच तेच लेगिंग्स किंवा प्लाझो घालून आता तो लूक जुना झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? त्याच साध्या कुर्त्याला थोड्या कल्पकतेने आणि 'मिक्स अँड मॅच'च्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. योग्य बॉटम वेअरची निवड, दुपट्ट्याची स्टाईल आणि दागिन्यांचा अचूक वापर केला, तर तोच जुना कुर्ता तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन आणि 'फ्रेश' लूक देऊ शकतो.3 / 9 कुर्ता विथ डेनिम जीन्स असा इंडो - वेस्टर्न लूक प्रत्येकीलाच शोभून दिसतो. साध्या कुर्त्याला निळ्या किंवा काळ्या जीन्ससोबत पेअर करा. कॉलेज किंवा कॅज्युअल आऊटिंगसाठी हा लूक परफेक्ट आहे.4 / 9 जर तुम्हांला तोच एक कुर्ता घालूंन प्रोफेशनल ऑफिस लूक करायचा असेल तर कुर्त्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाची सिगारेट पँट आणि फॉर्मल चप्पल घालून एक सोबर लूक अगदी सहज मिळू शकेल. 5 / 9 आपला आवडता नेहमीचाच फेव्हरिट कुर्ता सण - समारंभ किंवा खास प्रसंगी घालायचा असल्यास एक चांगला लूक सहज मिळू शकतो. साध्या कुर्त्याखाली हेवी शरारा घातल्यास लग्न, साखरपुडा, वाढदिवसाची पार्टी यांसारख्या छोटेखानी समारंभासाठी तुमचा 'इन्स्टंट' पार्टी लूक रेडी होईल.6 / 9 आपल्या आवडत्या कुर्त्यासोबतच जरा नेहमीपेक्षा वेगळा बोल्ड आणि ट्रेंडी लूक हवा असेल किंवा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर कुर्त्याला धोती पँट्ससोबत स्टाईल करा. यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खूप छान दिसते.7 / 9कुर्त्यावर एखादे सुंदर एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट घातल्यास साध्या कुर्त्यालाही रॉयल लूक मिळतो. 8 / 9 नेहमीचा जड दुपट्टा घेण्याऐवजी कुर्त्यावर एखादा प्रिंटेड सिल्क स्कार्फ किंवा बांधणीचा स्टोल वेगवेगळ्या पद्धतीने गुंडाळा. हे ऑफिससाठी अतिशय 'स्मार्ट आणि प्रोफेशनल' वाटते.9 / 9जर तुमचा कुर्ता घेरदार किंवा अनारकली प्रमाणे असेल तर तुम्ही परफेक्ट बेल्ट मॅच करुन एक स्टायलिश मॉडर्न लूक करु शकता. कॅज्युअल पार्टीसाठी हा लूक एकदम फिट आहे.