Join us

सुटलेलं पोट लपवणारे ६ ट्रेंडी स्टायलिश कपडे, बेली फॅटचं टेंशनच नाही, दिसाल एकदम फिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 15:13 IST

1 / 9
पोटावरची अतिरिक्त चरबी म्हणजेच Belly Fat अनेक महिलांसाठी (best style to hide belly fat) अतिशय लाजिरवाणी गोष्ट वाटते. पोटाची ढेरी किंवा वाढलेलं पोट (How to hide my lower belly fat in a dress) हे सौंदर्यदृष्ट्या ( 5 GENIUS Ways to Hide Belly Fat Instantly in Jeans) त्रासदायक वाटतं. विशेषतः काही पॅटर्नचे कपडे घातल्यानंतर पोटाची ढेरी अधिक जास्त प्रमाणात दिसते. यामुळे अनेकदा आपल्याला मनासारखे हवे त्या पॅटर्नचे, स्टाईलचे कपडे घालता येत नाहीत.
2 / 9
वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे घातल्यानंतर पोट उठून दिसल्यामुळे (Outfit Ideas to Hide Belly Fat) अनेकींचा आत्मविश्वास कमी होतो, चारचौघात लाजिरवाणे वाटते. परंतु अशा परिस्थितीत, कपडे घालण्यावर बंधन आणणे योग्य नाही. जिम किंवा डाएट जरी सुरू असलं, तरी डेली रुटीनमध्ये योग्य कपड्यांची निवड केल्याने आपण Belly Fat सहजपणे लपवू शकता आणि स्टायलिशही दिसू शकतो.
3 / 9
पाहूयात अशा काही स्मार्ट फॅशन टिप्स, आणि कपड्यांचे अनोखे पॅटर्न जे बेली फॅट लपवण्यास मदत करतील आणि तुमचा लुकही आकर्षक व सुंदर ठेवतील.
4 / 9
१. पोटाला किंवा अंगाला चिकटून बसणारे टाईट टॉप किंवा लो वेस्ट जीन्स यामुळे आपलं वाढलेलं पोट हमखास दिसणारच. यासाठी, आपण हाय वेस्ट जीन्स आणि थोडा लूज किंवा पेपलम (PEPLUM) टॉप देखील यावर घालू शकतो. PEPLUM टॉप सध्या बरेच ट्रेंड मध्ये असल्याने आपला लूक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसू शकतो. यामुळे आपण फॅशनेबल सुद्धा दिसू शकतो आणि आपले पोटही कव्हर केले जाईल.
5 / 9
२. टाईट आऊटफिट्सवर वेगवेगळ्या रंगांची, पॅटर्नची श्रग किंवा जॅकेट्स घालू शकतो. यासोबतच, प्लेन किंवा प्रिंटेड ओव्हरसाईझ शर्ट देखील आपण घालू शकतो. यामुळे तुम्ही ट्रेंडी तर दिसालच पण सोबतच पोटाची ढेरी देखील लपवली जाऊ शकते.
6 / 9
३. पोटाची ढेरी लपवण्यासाठी नेहमी गडद रंगांच्याच कपड्यांची निवड करा. काळा, नेव्ही ब्लू, डार्क ग्रे हे रंग आपल्याला स्लिम दिसायला मदत करतात.
7 / 9
४. जर तुम्ही कुर्ती सारख्या ट्रेडिशनल प्रकारातील कपड्यांची निवड करणार असाल तर नेहमी ए - लाईन किंवा थोडे घेर असणाऱ्या कुर्त्यांचीच निवड करा. ए - लाईन किंवा थोडे घेर असणारे कपडे तुमच्या पोटाची ढेरी लपवण्यास मदत करून तुम्हाला एलिगंट लूक देतात.
8 / 9
५. पोट लपवण्यासाठी नेहमी जीन्स घेताना, तुमच्या साइजपेक्षा एक साइज मोठी जीन्स निवडा. खूप घट्ट बसणारी जीन्स घातल्यास पोट अधिक उठून दिसते. त्याचबरोबर, निळ्या रंगाच्या ऐवजी काळ्या रंगाची किंवा गडद रंगाची जीन्स खरेदी करा, कारण काळा रंग आपल्याला सडपातळ दाखवतो. याचबरोबर, अशी जीन्स निवडा जी केवळ वेस्टवरच नाही, तर मांड्यांवरसुद्धा थोडी सैल असेल. अशा प्रकारेच तुमचं शरीर अधिक संतुलित आणि परफेक्ट दिसू शकतं.
9 / 9
६. जर तुम्हाला पोटाच्या ढेरीमुळे टॉप किंवा टी-शर्ट घालायचे नसतील, तर जीन्ससोबत आपण शॉर्ट किंवा लॉंग कुर्ती सहजपणे घालू शकतो. फ्लेयर्ड आणि स्किनी दोन्ही प्रकारच्या जीन्ससोबत कुर्ती खूपच छान दिसते. कुर्ती नेहमीच शॉर्ट असावी असं काही नाही, तुम्ही लॉंग कुर्तीही स्टाइलिश पद्धतीने घालू शकता.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स