1 / 8लग्नसमारंभ, खास फंक्शन किंवा पार्टीमध्ये घागरा, शरारा किंवा इंडो -वेस्टर्न फ्लेअरी आउटफिट्स घातले की आपला लूक अधिक खुलून दिसतो. पण या सगळ्यात आपला लूक खराब करणारी गोष्ट म्हणजे कंबरेजवळ दिसणारे साईड फॅट आणि सुटलेलं पोट. (Ghagra styling tips)2 / 8आरशासमोर उभे राहिल्यावर आपल्याला आपली कंबर जाड दिसू लागते. चेहरा देखील मोठा दिसतो. त्यामुळे आपला सगळा लूक खराब होतो. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आपण देखील सुंदर दिसू. (Sharara styling hacks)3 / 8जर आपली साईज प्लसपेक्षा अधिक असेल तर जास्त उंच असलेल्या कंबरेचा घागरा निवडा. यामुळे पोटाजवळ आणि साईड फॅट जास्त प्रमाणात दिसत नाही. 4 / 8घागरा खरेदी करताना त्याचे प्लेट्स आपल्या कंबरेच्या आकाराशी मॅच झाले पाहिजेत. कमीत कमी २४ प्लेट्स असलेला घागरा निवडा. आपल्याला फ्लेअर केलेला घागरा आवडत असेल तर जास्त प्लेट्स असलेला निवडा. 5 / 8आपल्या घागऱ्यावर डिझाइन असेल तर त्यामुळे आपली उंची दिसेल आणि त्यात आपण बारीकही दिसू. आपण उभा पॅटर्न असलेला घागरा निवडायला हवा. लहान प्रिंट देखील आपल्यावर शोभून दिसेल.6 / 8आपल्या शरारा किंवा घागऱ्यावर ओढणी हवी असेल तरी ती मऊ कापडाची असावी. यात आपण ऑर्गेन्झा, जॉर्जेट किंवा शिफॉनची ओढणी निवडू शकता. 7 / 8आपली ओढणी घालताना जास्त फ्री-फ्लोइंग स्टाईल टाळा. त्याऐवजी, प्लेटेड आणि योग्यरित्या पिन-अप स्टाईल करा, ज्यामुळे अधिक स्ट्रक्चर्ड लूक येईल.8 / 8ब्लाउज हे डीप आणि रुंद नेकलाइन्स असणारे शिवा. आपण प्लंजिंग व्ही-नेक, कॉर्सेट डिझाइन किंवा स्वीटहार्ट नेकलाइन निवडू शकतो. यासाठी परफेक्ट ज्वेलरी निवडल्यास देखील फायदा होईल.