Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महागडी पैठणी नेसली की बोंगा दिसू नये म्हणून ५ टिप्स, १५ मिनिटांत नेसा पैठणी चापूनचोपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 18:00 IST

1 / 8
आपल्यापैकी अनेकांच्या कपाटात एक तरी पैठणी साडी असेलच. ताईच्या, भावाच्या किंवा कुणाच्या लग्नात हौशीने घेतलेली पैठणी साडी नेसताना मात्र फुगते. अनेकदा निऱ्याच व्यवस्थित येत नाही. पैठणी सिल्कचा पोत आणि त्यावरील जरीचे काम यामुळे साडी नेसल्यावर बऱ्याचदा फुगते. यामुळे आपली उंची कमी दिसते किंवा शरीर जाड वाटते. (How to wear Paithani saree)
2 / 8
पैठणी साडी नेसल्यावर आपल्याला बारीक दिसायचे असेल, फुगू नये असे वाटतं असेल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा.(Paithani saree draping tips)
3 / 8
पैठणी साडी कपाटात घड्या घालून ठेवलेली असते, त्यामुळे तिचे पदर आणि काठ कडक होतात. साडी नेसण्यापूर्वी हलक्या हाताने इस्त्री करा. यामुळे साडीचा कडकपणा कमी होईल.
4 / 8
पैठणीच्या निऱ्या घालताना त्या फार जास्त जाड ठेवू नका. मध्यम आकारात ६ ते ७ निऱ्या घाला. पोटाजवळ निऱ्या खोचताना त्या एकावर एक न ठेवता थोड्या पसरवून खोचा. यामुळे पोट फुगीर दिसत नाही.
5 / 8
निऱ्या खोचल्यानंतर गुडघ्याच्या थोड्या वरच्या बाजूला साडीच्या आतून एक पिन लावा. यामुळे चालताना निऱ्या विस्कटणार नाही. पदराची पिन खांद्यावर थोडी मागे लावा. त्यामुळे पदर गळ्याजवळ घट्ट होणार नाही.
6 / 8
पैठणी नेसताना कॉटनचा पेटीकोट वापरण्याऐवजी साडी शेपवेअर निवडा. यामुळे साडी शरीराला व्यवस्थित चिकटून बसेल.
7 / 8
पदर सोडणार असाल तर त्याच्या निऱ्या व्यवस्थित सेट करुन पिन लावा. ज्यामुळे साडीचा लूक सुटसुटीत दिसेल.
8 / 8
साडी नेसल्यानंतर निऱ्या आणि पदरावरुन जोर देऊन हात फिरवा. ज्यामुळे कापड कडक वाटणार नाही.
टॅग्स : फॅशनमहिलासाडी नेसणे