Join us

शॉर्ट,लॉन्ग की स्लीव्हलेस? ब्लाऊजच्या बाह्यांचा कोणता पॅटर्न होईल सूट, हे अचूक सांगणारी भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2025 18:04 IST

1 / 7
साडीचा परफेक्ट लूक हा फक्त साडीच्या डिझाईनवर किंवा ड्रेपिंगवर (how to identify which blouse hand length suits you) अवलंबून नसतो, तर ब्लाऊजचे फिटिंग आणि त्याची पॅटर्न देखील तितकीच गरजेची असते. जर ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगचे आणि योग्य पॅटर्नचे असेल, तर साडीची शोभा आणखी वाढते.
2 / 7
परंतु, ब्लाऊज शिवताना किंवा तयार ब्लाऊज विकत घेताना अनेक (how to choose perfect blouse sleeve length) महिलांच्या मनात एक मोठा गोंधळ असतो ब्लाऊजच्या बाह्या लांब (Long Sleeves) ठेवायच्या की शॉर्ट (Short Sleeves). कारण दोन्ही स्टाइल्स आकर्षक दिसतात, पण प्रत्येकाचा चेहरा, शरीरयष्टी आणि साडीचा प्रकार यावर योग्य लांबी ठरते. चुकीची निवड केल्यास ब्लाऊजचा लूक बिघडतो आणि साडीची शोभा कमी होते.
3 / 7
शरीराच्या ठेवणीनुसार आणि हातांच्या आकारानुसार, नेमक्या कोणत्या प्रकारच्या बाह्या (blouse sleeve length according to body type) आपल्याला सर्वात जास्त सूट होईल, हे ठरवणे कठीण होते. एक सोपी ट्रिक वापरून आपण अगदी सहज ओळखू शकतो की आपल्याला लांब बाह्यांचा ब्लाऊज सूट होतो की शॉर्ट स्लीव्ह्सचा. पाहूयात ती खास ट्रिक...
4 / 7
ही खास ट्रिक करण्यासाठी आपल्याला एक टेलरकडे असते तशी मेजरींग टेप, वही, पेन इतकं साहित्य लागेल. ही मेजरींग टेप तुमच्या मनगट आणि दंडाच्या भोवती गोलाकार गुंडाळून योग्य ते माप घ्यायचे आहे. ही अचूक माप एका कागदावर लिहून घ्या.
5 / 7
त्यानंतर, अचूक मापाचे जे काही आकडे मिळतील त्या दोघांचा भागाकार करा. भागाकार केल्यानंतर जे काही उत्तर येईल ते जर २.५ पेक्षा जास्त असेल तर तुमच्यावर, थ्री - फोर्थ तसेच फ़ुल्ल् स्लीव्हज अधिक जास्त शोभून दिसतील.
6 / 7
तसेच जर भागाकार केल्यावर उत्तर, २.० पेक्षा कमी असेल तर, स्लिव्हलेस आणि फुल्ल स्लिव्ह्ज पॅटर्नच्या बाह्या तुम्हाला सुंदर दिसतील.
7 / 7
याचबरोबर, जर तुमचे उत्तर २.० ते २.५ या दोघांच्यामध्ये येत असेल तर तुमच्यावर सगळ्याच प्रकारच्या बाह्यांचे ब्लाऊज उठून दिसेल. याचाच अर्थ तुम्ही स्लिव्हलेस, थ्री - फोर्थ स्लिव्ह्ज आणि फुल्ल स्लिव्ह्ज अशा सगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज नक्की ट्राय करु शकता.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स