1 / 7कोणत्याही खास प्रसंगी किंवा सण-समारंभात आपण अतिशय हौसेने महागडी साडी किंवा डिझायनर ड्रेस खरेदी करतो. पण अनेकदा असं होतं की इतकं नटून-थटूनही आरशात पाहिल्यावर लूक आपला पूर्ण होत नाही. त्याच कारणं असतं आपण निवडलेले चुकीचे दागिने. (Earrings according to face shape)2 / 7आपल्या चेहऱ्यानुसार आपण कोणत्या पद्धतीचे कानातले निवडायला हवे, पाहूया. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात अधिक भर पडेल. (Best earrings for face shape)3 / 7ज्यांचा चेहरा गोल असतो, त्यांच्या गालांचे हाड थोडे रुंद असतात. अशा चेहऱ्याला थोडे 'स्लिम' आणि लांबट दाखवण्यासाठी लांब लोंबणारे कानातले चांगले दिसतात. 4 / 7ओव्हल किंवा अंडाकृती चेहरा असणाऱ्या सर्व प्रकारचे कानातले सूट होतात. मोठे झुमके, स्टड्स किंवा सुई-धागा स्टाईल कानातले अधिक छान दिसतील. 5 / 7चौकोनी चेहरा असणाऱ्यांनी गोल आकाराचे दागिने निवडायला हवे. मोठे गोल हुप्स, गोल चांदबाली किंवा ओव्हल आकाराचे कानातले आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर दिसतील.6 / 7आपला चेहरा लांबट असेल तर स्टड्स, कानाला चिकटून असलेले मोठे टॉप्स किंवा गोलाकार झुमके वापरा.7 / 7हार्ट शेप चेहरा असणाऱ्यांनी टियर-ड्रॉप इअररिंग्स किंवा झुमके वापरायला हवे. यामुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते.